गेवराईबीड जिल्हा

भोजगाव येथील संत परिवाराला अमरसिंह पंडित यांच्या हस्ते आर्थिक मदत

गेवराई) गेवराई तालुक्यातील मौजे
भोजगाव येथील शेतकरी कै. महादेव संत यांच्या परिवाराला माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या हस्ते शासकीय आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले.

भोजगाव येथील कै. महादेव संत यांचा २०२० मध्ये झालेल्या पावसात अमृता नदीवरील पूल वाहून गेल्यामुळे त्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता. माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांनी त्यावेळेस संत परिवाराची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले होते. अमरसिंहपंडित यांच्या पाठपुराव्यामुळे संत परिवाराला शासनाची मदत मिळाली. आज अमरसिंह पंडित यांच्या हस्ते ४ लक्ष रुपयांचा शासकीय मदतीचा धनादेश संत कुटुंबियातील
वारसदार रंजना महादेव संत यांना सुपूर्द करण्यात आला
यावेळी दत्ता संत, तात्यासाहेब संत यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button