केजबीड जिल्हा

केज शहरासह तालुक्यात लॉकडाऊनची अमंलबजावणी कडक

लॉकडाऊनच्या नियमांची शिस्त लावण्यासाठी तहसिलदार व त्यांची टिम २४ तास रस्त्यावर.

महादेव काळे,केज.

कोरोना सारख्या महामारीला रोखण्यासाठी आज सारा देश एकवटून लढा देत असुन या महामारीचे रूग्न दिवसेंदिवस वाढतच आहेत. तर या कामासाठी नेमण्यात आलेले अधिकारी, कर्मचारी , स्वंयसेवक पोलीस ,.डॉक्टर व त्यांची सर्व टिम अहोरात्र जिवापाड मेहनत घेत आहे.
नुकताच बिड जिल्ह्यात जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी मा.रविंद्र जगताप यांनी गेल्या २६ मार्च पासून लॉकडाऊन सुरु करण्यासाठी आदेश केल्याने काही ठिकाणी या आदेशाला विरोध झाला तर काही ठिकाणी त्याचे पालन तंतोतंत केले गेले.
केज तालुक्यातील केज शहरासह ग्रामीण भागातही या आदेशाचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. केजचे तहसीलदार मा.दुलाजी मेंडके साहेब यांनी कोरोनाच्या महामारीला रोखण्यासाठी गेल्या वर्षी देखील स्वतः रस्त्यावर ऊतरून आपले कर्तव्य बजावले होते. त्यामुळे त्यांच्या या महान कार्यामुळे केजच्या आदर्श पत्रकार संघाच्या वतीने आदर्श कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसे त्यांचे ईतर कार्यही ते तशाच पध्दतीने करतात. यावर्षी पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली असल्याचे प्रशासकीय स्तरावरून सांगितले जात आहे असल्याने व जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशानुसार केजचे तहसीलदार मा. दुलाजी मेंडके यांनी केज तालुक्यातील सर्वत्र लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यासाठी आपल्या सर्व टिमसह रस्त्यावर ऊतरले असुन त्यांच्या सोबत त्यांची मोठी तगडा यंत्रणा लावली आहे. त्यामध्ये त्यांचे सोबत नायब तहसीलदार मा. सचिन देशपांडे , मा.लक्ष्मण धस , मा. सुहास हजारे त्यांचे ईतर कर्मचारी तसेच केज नगर पंचायतचे सर्व कर्मचारी पोलीस अधिकारी, कर्मचारी , शिक्षक , महसूल विभाग हि सारी यंत्रणा जनतेच्या हितासाठी जनतेला वाचवण्यासाठी रात्रंदिवस ऊन्हातान्हात झटत आहेत. तिन दिवसाच्या लॉकडाऊननंतर जिल्हाधिकारी यांनी मंगळवार पासून लॉकडाऊनमध्ये थोडीशी ढिलाई देत सकाळी ७:०० ते दुपारी १:०० वाजेपर्यंत मुभा दिल्याने केजमध्ये मंगळवारचा आठवडी बाजार असल्याने व वेळ कमी असल्याने सकाळपासूनच केज शहरात एकदम गर्दी झाली होती. परंतु दुपारी १:०० वा सवलत दोन ल्याची वेळ संपताच केजचे तहसीलदार मा. मेंडके साहेब यांनी त्यांची टिम सोबत घेवुन नायब तहसीलदार मा. सचिन देशपांडे यांनी ध्वनीक्षेपकाद्वारे गर्दी तात्काळ कमी करा. रस्त्यावर कोणही फीरु नका असे म्हणत एवढा भरलेला बाजार फक्त दहा मिनिटात बंद होवुन संपूर्ण रस्ता निर्मनुष्य झाला. तर त्या नंतर संपूर्ण केज मध्ये स्वतः फिरून लॉकडाऊनची अमंलबजावणी कडक केली.
एवढ्या तात्काळ संचारबंदी लागु होत असल्याचे चित्र प्रथमच केज वासियांनी पाहिल्याने तहसीलदार व त्यांच्या सर्व टिमचे सर्वच स्तरातुन कौतुक होत आहे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button