गेवराईबीड जिल्हा

दिव्यांग शाळेतील कर्मचा-यांच्या विविध प्रश्नांबाबत जिल्हाध्यक्ष लहुराव ढोबळेंनी घेतली दिव्यांग कल्याण आयुक्तांची भेट

गेवराई : दिव्यांगांच्या बंद केलेल्या / नोंदणी प्रमाणपत्र रद्द झालेल्या अनुदानित विशेष शाळा / कर्मशाळेतील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या समायोजना करिता गुगल्स फाॅर्म्स मध्ये माहिती भरणे बाबत आवाहन करण्यात आलेले आहे. दरम्यान दि. २० जुुुन २०२० पर्यंतच फेटाळलेल्या / बंद झालेल्या शाळा / कर्मशाळांची माहिती मागविलेली आहे. परंतु त्यानंतरही अनेक शाळा, कर्मशाळा बंद पडलेल्या असून सदर शाळा, कर्मशाळांमधील कर्मचा-यांवर अन्याय होत असून त्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे आजतागायत बंद पडलेल्या शाळा कर्मशाळांमधील मान्यता प्राप्त कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत लवकरात लवकर कार्यवाही व्हावी. अशी मागणी शिक्षक भारती विशेष शाळा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष लहूराव ढोबळे यांनी दिव्यांग कल्याण आयुक्त ओमप्रकाश देशमुख, आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांची भेट घेवून विविध मागण्यांबाबत निवेदन दिले.

बंद पडलेल्या शाळा / कर्मशाळांमधील मान्यता प्राप्त कर्मचा-यांची कागदपत्रे ही संस्था स्तरावर तसेच जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्या कार्यालयात उपलब्ध असतात. परंतू सध्य:स्थितीत सर्वत्र कोविड- 19 ची साथ चालु आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष कागदपत्रे गोळा करण्यामध्ये अडचण येत आहे. तसेच संबंधीत संस्था हया कमंचा-यांना कागदपत्रांबाबत प्रतिसाद देत नाहीत. याबाबत कर्मचा-यांनी संघटनेकडे तक्रार केलेली आहे. तसेच ऑनलाईन माहिती भरण्यामध्ये अनेक तांत्रिक अडचणी येत असून त्यामध्ये परिपूर्ण माहिती भरली जाण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे यापूर्वीची समायोजनाची जी पध्दती अस्तित्वात आहे. त्याप्रमाणेच समायोजन प्रक्रीया राबवावी अशी विनंती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.बंद पडलेल्या दिव्यांगांच्या अनुदानित विशेष शाळेमधील अतिरिक्त ठरलेल्या कर्मचा-यांच्या समायोजना करिता यापूर्वी संस्था स्तरावरुन जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांचे स्तरावर माहिती मागविली जाई व त्यानंतर जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांचेस्तरावर पडताळणी करुन सदरची माहिती आयुक्तालयास सादर केली जात असे. सदर प्रक्रीयेमध्ये सुसुत्रता होती. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच समायोजनाची प्रक्रीया राबविण्यात यावी. तसेच कर्मचा-यांचे लवकरात लवकर समायोजन करुन न्याय दयावा अशी मागणी संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button