जालनामराठवाडा

सतत खंडीत होणाऱ्या वीजपुरवठयामुळे आष्टीसह परिसरातील नागरिक त्रस्त वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी नसता आंदोलन करण्याचा इशारा

आष्टी/ प्रतिनिधी
परतुर तालुक्यातील आष्टी व परिसरातील चाळीस खेड्यातील नागरिक गेल्या अनेक दिवसांपासून सतत खंडीत होणाऱ्या विजेमुळे त्रस्त झाले असून,येथील महावितरण कार्यालयात गेल्या सात महिन्यापासून सहाय्यक अभियंता हे पद रिक्त असल्यामुळे आष्टी तसेच काऱ्हाळा,को.हदगाव येथे असणाऱ्या 33 केव्हीचा कारभार हा केवळ कर्मचारी यांच्या भरवशावर आहे.या ठिकाणी कुणी अभियंता नसल्यामुळे सतत खंडीत होणाऱ्या वीजपुरवठ्याचा वाली कोण असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.सध्या लॉकडाऊन असल्यामुळे नागरिकांना घरातच थांबावं लागत आहे,उन्हाळ्याचे दिवस त्यात विजेचा असा लपंडाव यामुळे आष्टी सह चाळीस खेड्यातील नागरिक या वीज वितरण कार्यालयाच्या कारभाराला वैतागले आहेत.त्या अनुषंगाने आष्टी येथील व्यापारी व नागरिक यांनी उपकार्यकरी अभियंता परतूर यांना निवेदन देऊन लवकरात लवकर आष्टी येथील सहाय्यक अभियंता हे रिक्त असलेले पद भरावे व सतत खंडीत होणारा वीजपुरवठा सुरळीत करावा नसता आपल्या कार्यालया पुढे तीव्र निदर्शने करण्यात येतील असे दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे.यावेळी मोहन बाण,कमळाजी आगलावे,बालाजी मोटे,राजेंद्र बाहेती,श्रीकृष्ण टेकाळे, साळीकराम व्यवहारे आदींची उपस्थिती होती.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button