केजबीड जिल्हा

विकेंड लॉकडाऊनला केजसह तालुक्यात जनतेकडून चांगला प्रतिसाद.

केज शहरात चौकाचौकात पोलीसांचा ताफा;प्रशासनाच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन.

महादेव काळे ,

केज
कोरोना महामारीचे संकट सद्या राज्यावर घोंघावत असुन त्याचे परिणाम बिड जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्याने शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात कडक निर्बंध लागु असुन शनिवार पासून सोमवार पर्यंत विकेंड लॉकडाऊन सरु असल्याने केजसह तालुक्यात त्याची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की गेल्या वर्षभरापासून कोरोना आजाराने सळो कि पळो करुन सोडले असल्याने जनजिवन विस्कळीत झाले होते. परंतु मध्यंतरीच्या काळात काहिशी जणु त्याने ढिलाई दिली होती. त्यामुळे जनजिवन हळूहळू पुर्वपदावर येत असतानाच पुन्हा त्याने आपले आक्राळविक्राळ रूप धारण करत संपूर्ण देशात व महाराष्ट्र राज्यात कोरोना महामारीने कहर केला असून त्यामुळे आता पुन्हा एकदा सर्वांना घरात कैद होण्याची जणु वेळ येवून ठेपली आहे. त्यामुळे जनतेच्या जिवाचा विचार करून मुख्यमंत्री महोदयांनी राज्यात कडक निर्बंध लावले असले तरी त्यात अनेक जिवनावश्यक वस्तुच्या दुकानाला सवलत दिल्याने त्याचा परिणाम फारसा होत नसल्याचे लक्षात आल्याने विकेंड लॉकडाऊनची शनिवार पासून राज्यभर अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून केजसह संपूर्ण तालुक्यात त्याची कडक अंमलबजावणी करण्यात आली. शनिवारी सकाळपासून केज शहरात सर्व दुकानदार , व्यापारी , छोटेमोठे व्यवसायिक यांनी आपापले दुकाने बंद ठेवून या विकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद दिला आहे. दिवसभर सर्व रस्ते ओस पडले होते. तर खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस प्रशासनाकडून तगडा बंदोबस्त ठेवून मुख्य रस्त्यावरील शिवाजी महाराज चौक , कानडी चौक , बस्थानक , धारूर चौक , आदी ठिकाणी पोलीस व होमगार्ड , महिला पोलीस कर्मचारी यांचे ताफे दिसून आले. तर केज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदिप त्रिभुवन हे स्वतः आपल्या गाडीतून शहरात गस्त घालत होते.
तसेच तहसीलदार व नायब तहसिलदार हे देखील ध्वनीक्षेपकाद्वारे जनतेला घराबाहेर न पडता घरातच राहण्याचे आवाहन करत होते. त्यामुळे शासनाच्या या विकेंड लॉकडाऊनला जनतेने स्विकारत गरजवंत व्यक्तीना वगळता शनिवारी कोणीही आपल्या घराबाहेर न पडता घरातच राहणे पसंत केले. त्यामुळे शासनाच्या या आदेशाचे केज तालुक्यातील जनतेने काटेकोर पणे पालन केले असल्याचे दिसून आले.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button