गेवराईबीड जिल्हा

गेवराईत २०० खाटांचे कोविड केअर सेंटर उभारणार

अमरसिंह पंडित यांनी आरोग्य विभागाचा घेतला आढावा

गेवराई ) कोविड पॉझिटीव्ह रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात खाटा मिळत नसल्याच्या पार्श्‍वभुमीवर गेवराई तालुक्यात २०० खाटांचे कोविड केअर सेंटर आरोग्य विभागाच्या मदतीने सुरु करणार असल्याची माहिती माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी दिली, पुढील आठवड्यात पहिल टप्यात १०० खाटांचे कोविड केअर सेंटर कार्यान्वीत होणार असुन या ठिकाणी ऑक्सीजनची सुविधा सुद्धा उपलब्ध करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी तहसिलदार सचिन खाडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय कदम, वैद्यकीय अधिक्षक डॉ. महादेव चिंचोळे उपस्थित होते. रुग्णांना उपचारासाठी लागणार्या सुविधांचा आढावा घेवुन त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याशीही दुरध्वनीवर चर्चा केली.

कोरोना सारख्या महामारीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदर अमरसिंह पंडित व शिवछत्र परिवाराने मोठ्या प्रमाणावर गरजु लोकांना यापुर्वी मदतीचा हात दिला. आरोग्य यंत्रणेला व्हेंटीलेटर, एक्सरे मशिन सह मोठ्या प्रमाणावर आरोग्य विषयक यंत्र सामुग्री भेट म्हणुन दिली. कोरोनाच्या दुसर्या लाटेत सुद्धा माजी आमदार अमरसिंह पंडित सक्रीय झाले असुन त्यांनी आरोग्य यंत्रणेला मदत करण्याचा निर्धार केला आहे. शनिवार दि. १० एप्रील रोजी गेवराई येथे वाढत्या कोविड रुग्ण संख्येबाबत त्यांनी आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. तालुक्यात २०० खाटांचे कोविड केअर सेंटर उभारणीसाठी त्यांनी स्वता:हुन पुढाकार घेतला असुन शिवाजीनगर (गढी) येथील जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या इमारतीमध्ये हे सेंटर सुरु करण्याची तयारी दर्शविली आहे. गेवराई येथुन मोठ्या प्रमाणावर कोविड रुग्ण उपचारासाठी बीड येथे जातात अनेकांना ऑक्सीजन बेड सह इतर आरोग्य सुविधा मिळत नाहीत. या पार्श्‍वभुमीवर त्यांनी गढी येथील जयभवानी शिक्षण संकुलातील कोविड केअर सेंटर मध्ये २० ऑक्सीजन बेड सुरु करणे बाबत तयारी दर्शविली आहे.

अमरसिंह पंडित यांच्या सहकार्याने गेवराई तालुक्यात कोविड केअर सेंटर सुरु होणार असल्यामुळे आता कोविड रुग्णांना उपचारासाठी मोठी मदत मिळणार आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय कदम व उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. महादेव चिंचोळे यांनी जागेची पहाणी करुन आरोग्य सुविधा उभारणी बाबत मार्गदर्शन केले. गेवराई तालुक्यातील कोविड रुग्णांना भविष्यात अडचणी निर्माण होवु नये यादृष्टीकोणातुन माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी हे पाऊल उचलले आहे त्याचा मोठा ङ्गायदा तालुक्यातील कोविड रुग्णांना होणार आहे. पहिल्या टप्यात पुढच्या आठवडाभरात १०० खाटांचे कोविड केअर सेंटर सुरु होणार असुन आवश्यकतेप्रमाणे पुढील १०० खाटांचे नियोजन करण्यात येणार असुन या ठिकाणी २० ऑक्सीजन बेड तातडीने सुरु केले जाणार आहेत. यामुळे तालुक्यातील आरोग्य यंत्रणेचा मोठा भार कमी होणार आहे, केवळ उपदेश आणि सल्ला न देता माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी थेट कृती केली असल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button