बीड जिल्हा

हॉटेल मध्ये वाढदिवस साजरा करणाऱ्यांना पहावी लागेल जेलची हवा – अँड. अजित देशमुख

बीड  ) सध्या कोरोना मुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेकांना आपापले काम धंदे सुधारत नाहीत. काय करावे, यावर जेवढी जनता त्रस्त आहे, तेवढेच शासनही त्रस्त आहे. पण यातून मार्ग काढत अनेक जण हॉटेलमध्ये वाढदिवस साजरा करताना दिसत आहेत. त्यामुळे असा प्रकार जर समोर आला तर वाढदिवस साजरा करणार यांना जेलची हवा खावी लागेल, असा इशारा जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी दिला आहे.

मध्यंतरी हॉटेलमध्ये लग्न लागल्याचे प्रकार समोर येत होते. मंगल कार्यालय वाल्यांनी शासनाचे नियम पाळले आणि मंगल कार्यालयातील मोठ्या जमावाचे लग्न बंद केले. त्यामुळे लग्न लावण्यासाठी लोक हॉटेल कडे वळले होते. आता या प्रकारावर काही अंशी बंदी आल्यासारखे झाले आहे.

मात्र जे हॉटेल चालक राजकारणात आहेत अथवा एखाद्या नेत्याला चिटकून आहेत, असे काही हॉटेल चालक अजूनही या गोष्टी मानायला तयार नाहीत. हॉटेलमध्ये वाढदिवस साजरा केली जात आहेत. अशा तक्रारीही जन आंदोलनाला प्राप्त होत आहेत, ही बाब गंभीर आहे.

हे सर्व घडत असताना त्या त्या भागातील प्रशासन नेमके काय करत आहे, हे कळत नाही.गावातील पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी, संबंधित पोलिस स्टेशन मधील बीट अंमलदार आणि पोलिस निरीक्षक यांचे सह अन्य प्रशासन गैरप्रकार रोखण्यासाठी पुढे येण्याची अनेकांवर जबाबदारी आहे. मात्र हे मूग गिळून का गप्प बसतात ? हे समजत नाही.

त्यामुळे असे वाढदिवस जर साजरे होत असतील, तर ही बाब त्या भागातील जनतेने प्रशासनाला कळवावी. गैर प्रकारांवर आळा घालण्यासाठी त्या भागातील जनतेने पुढे यावे. या लोकांवर जरब बसवण्यासाठी काही कारवाया झाल्या पाहिजेत. वाढदिवस ज्या हॉटेल मध्ये साजरा केला जातो, त्या हॉटेलचा मालक, चालक याचा वाढदिवस साजरा होत आहे, तो व्यक्ती, त्याचे नातेवाईक, आई, वडील आणि जमलेल्या गर्दीवर कारवाई व्हायला पाहिजे. प्रशासनाने या लोकांना जेलची हवा दाखवण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन अँड. अजित देशमुख यांनी केली आहे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button