गेवराईबीड जिल्हा

व्यापारी गाळे व फळ-भाजीपाला मार्केटचा शुभारंभ माजी आ.अमरसिंह पंडित यांच्या हस्ते होणार

गेवराई, ) ः- मराठवाड्यातील अग्रगण्य बाजार समिती म्हणून ओळख निर्माण करणार्या गेवराई कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने ११ कोटी ४३ लक्ष रुपये किंमतीच्या व्यापारी गाळे व फळ-भाजीपाला मार्केटचा शुभारंभ माजी आ.अमरसिंह पंडित यांच्या हस्ते गुढी पाडव्याच्या शुभू मुहूर्तावर होणार आहे. याप्रसंगी महाराष्ट्र शासनाच्या कोरोनाविषयक सव नियमांचे काटेकोर पालन करणार असल्यामुळे केवळ पाच लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार असून सदरील कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित न राहता सोशल मिडीयाच्या माध्यमातून हा कार्यक्रमा पहावा असे आवाहन बाजार समितीचे सभापती जगन्नाथ काळे यांनी केले आहे.

गेवराई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी गाळे व फळ-भाजीपाला मार्केट बांधकामाचा भव्य शुभारंभ माजी आ.अमरसिंह पंडित यांच्याहस्ते चैत्र गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मंगळवार, दि.१३ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता बीड रोडवर महामार्गालगत होणार आहे. ११ कोटी ४३ लाख रुपये किंमतीच्या या कामामध्ये मुख्य महामार्गावर व्यापारी गाळे, १ हजार मे.टन क्षमतेचे गोदाम, शेतकरी सभागृह, लिलाव शेड, सौर पथदिवे, कंपाऊंड वॉल, कार्यालयीन इमारत, भुईकाटा फाऊंडेशन, मुख्य प्रवेशद्वार आदी कामांचा समावेश आहे. शेतकर्यांना आपला शेतीमाल आणि फळ-भाजीपाला याठिकाणी थेट विक्री करण्यासाठी याचा फायदा होणार असल्याची माहिती सभापती जगनपाटील काळे यांनी दिली.

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने दिलेल्या नियमावलीची काटेकोर अंमलबजावणी या कार्यक्रमात होणार असल्यामुळे केवळ पाच लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार असून कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित न राहता सोशल मिडीयाच्या माध्यमातून हा कार्यक्रम पहावा असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगन्नाथ काळे, उपसभापती शाम मुळे आणि प्रभारी सचिव गंगाभिषण शिंदे यांनी केले आहे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button