केजबीड जिल्हा

कोरोना विरुद्धची लढाई ही फक्त प्रशासनाची नसल्याने सर्वानी काळजी घ्यावी ! मा. शरद झाडके, उपजिल्हाधिकारी

केज,(प्रतिनिधी)

कोरोना हा महाभयंकर आजार असून त्याच्या विरुद्धची लढाई की केवळ प्रशासनाची नसून त्यासाठी जनतेने देखील सहकार्य करण्याची अपेक्षा उपजिल्हाधिकारी मा.शरद घाडगे यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना केली.

केज उपविभागातील वाढता कोरोना संसर्ग आणि त्यावर प्रसिद्धी माध्यमाद्वारे जनजागृती करण्यासाठी उपविभागीय अधिकारी शरद झाडके हे केज येथे आले होते. या वेळी त्यांनी कोरोनाच्या उपाय योजनांचा आढावा घेऊन प्रसिद्धी माध्यमांच्या माध्यमातून जनजागृती करून वार्ताहारांशी संवाद साधताना उपविभागीय अधिकारी शरद झाडके म्हणाले की, सध्या केज, अंबाजोगाई, माजलगाव, धारूर आणि परळी या अंबाजोगाई विभागातील तालुक्यात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. प्रशासन, आरोग्य यंत्रणा, महसूल यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस प्रशासन हे रात्रंदिवस प्रचंड मेहनत घेत आहेत. रुग्णांवर उपचार करून त्यांना दुरुस्त करण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करीत आहोत. परंतु अनेकजण निष्काळजीपणा दाखवून प्रशासनाला सहकार्य करीत नाहीत. त्यांच्या बेफिकीरीमुळे संसर्ग वाढत आहे. हाच निष्काळजीपणा त्यांना भोवत आहे. त्यामुळे त्यांच्या घरापर्यंत कोरोनाचा संसर्ग पोहोचत आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वतः आणि कुटुंबाचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. असे आवाहन त्यांनी केले. तसेच काही व्यापारी व दुकानदार हे नियम पाळत नाहीत. याची देखील माहिती प्रशासनाकडे उपलब्ध आहे. सर्व कोरोना
सेंटर्स फुल्ल होत आहेत. आणि याच प्रमाणे रुग्णसंख्या वाढत राहिल्यास उपचार मिळणे अवघड होईल. तसेच येथील कोरोना सेंटरमध्ये काहीजण खोडसाळपणा करीत असून त्याचे फोटो सोशल माध्यमांवर अपलोड करीत आहेत. अशी खंत त्यांनी व्यक्त केली. त्याच बरोबर अत्यावस्थ रुग्णांना ऑक्सिजन मिळण्यासाठी प्रशासन काळजी घेत असून रेमेडीसिवीर याचा काळाबाजार रोखण्यासाठी अन्न व औषधी विभाग प्रयत्नशील आणि सक्षम आहे. असेही त्यांनी सांगितले. मात्र कोणतीच मोहीम किंवा मिशन जर यशस्वी करायचे असेल तर त्यासाठी लोकांचा सहभाग आणि सहकार्य या शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यासाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा असल्याची भावना व्यक्त केली.
यावेळी तहसीलदार दुलाजी मेंडके, नायब तहसीलदार सचिन देशपांडे व केज येथील पत्रकार मंडळी उपस्थित होते.

कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी व आरोग्य यंत्रणे वरील ताण कमी करण्यासाठी आवश्यकता भासल्यास लोकसहभागातून समांतर आरोग्य यंत्रणा उभी करण्यासाठी समाजातील दानशुरानी पुढे येण्याचे आव्हानही शरद झाडके यांनी केले आहे.

 

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button