बीडबीड जिल्हा

पेठ बीड भागात लसीकरण केंद्र सुरू:नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागरांचा पाठपुरावा

बीड- पेठ बीड भाग हा बहुजन कष्टकरी,मजुरांचा भाग आहे या भागातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने नगराध्यक्ष डॉ भारतभुषण क्षीरसागर यांनी आरोग्य विभागाकडे सतत पाठपुरावा केल्याने 45 वर्षा वरील नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधित लस उपलब्ध झाली असुन लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन आपले कर्तव्य पार पाडावे असे आवाहन नगरसेवक विकास जोगदंड यांनी केले आहे

नागोबा गल्ली पेठ बीड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी आरोग्य विभागाकडे केलेल्या मागणी नुसार पेठ बीड भागातील 45 वर्षा वरील नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधित लस उपलब्ध झाली असुन आज या लसीचा शुभारंभ या भागाचे नगरसेवक अँड विकासजी जोगदंड यांच्या उपस्थित करण्यात आला या प्रसंगी पेठ बीड विभाग आरोग्य प्रमुख डॉ आगळे मॅडम,रांदळ मॅडम,वराट व्हीएस,रडे अश्विनी, राजश्री जोशी,शेख रिजवान,मोमीन मुस्तकिन,घरात भाग्यश्री, विजयमाला जावळे,उषा जाधव, सोनू जोगदंड,अर्चना वीर,वर्षा जाधव, मंगेश जोगदंड,सचिन जाधव,महादेव वंजारे,परिचारक,परिचारीका,सह लसीकरणासाठी आलेले जेष्ठ नागरीक माता भगिनीं आदी उपस्थित होते याप्रसंगी 45 वर्षा वरील सर्व जेष्ठांनी आवश्यकतेनुसार लस घेण्याचे आव्हान देखील अँड विकास जोगदंड यांनी केले आहे

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button