बीडबीड जिल्हा

बीड पोलीसांचे नागरिकांना आवाहन

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि राज्यशासनाच्या कोव्हिड -19 निबंधाची अंमलबजावणी..

राज्यामध्ये कोव्हिड -19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंध व नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 , साथरोग कायदा 1897 आणि या संदर्भातील इतर अधिनियम लागू करण्यात आलेले आहेत . कोव्हिड -19 विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने आपत्कालीन उपाय योजनेचा भाग म्हणून संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रात निबंधाची घोषणा केलेली असून त्याबाबत ब्रेक द चैन अंतर्गत आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत . दि . 22-04-2021 रोजी रात्री 08:00 वा पासून ते 01-05-2021 रोजीचे सकाळी 07:00 पर्यंत कडक निबंध लागू करण्यात आलेले आहेत . तरी या निबंधानुसार बीड जिल्ह्यातील नागरिकांना बीड पोलीसांकडून आवाहन करण्यात येते की , या ” ब्रेक द चैन मध्ये कडक निबंधात सहकार्य करून कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्याच्या शासनाच्या मोहिमेत सामील व्हावे . या व्यतिरिक्त जे नागरिक निबंधाचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे . त्यामध्ये ” ब्रेक द चैन ” या अतर्गत लावण्यात आलेल्या निबंधाचे उल्लंघन करून रस्त्यावर विनाकारण फिरणारे व्यक्ती , मास्क न वापरणारे , सामाजिक अंतर न पाळणारे , निबंधाचे उल्लंघन करून आस्थापना , हॉटेल , दुकाने सुरु ठेवणारे , नियमबाह्य खाजगी प्रवासी वाहतुक करणारे , फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 144 चे उल्लघंन करणारे यांच्यावर पोलीसांकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे . सदर अंमलबजावणीसाठी बीड पोलीस सतर्क असून जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदी , चेक पोस्ट लावण्यात आलेल्या आहेत आणि बीड पोलीसांचे संपुर्ण जिल्ह्यात पोलीस ठाण्याचे पेट्रोलिंग पथके , भरारी पथके , तसेच ड्रोन कॅमेऱ्यांच्या साह्याने कडक नजर ठेवण्यात येणार आहे . बीड पोलीसांकडून बीड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की , कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे .

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button