बीडबीड जिल्हा

श्री साईराम अर्बन बँकेकडून कै.वाघमारे संगिता गणेश यांच्या कुटुंबियांना ११,०००/- आर्थिक मदत.

बीड येथील रहिवाशी असलेल्या बीड येथील श्री साईराम अर्बन बँकेच्या खातेदार सौ.वाघमारे संगिता गणेश यांचे काही दिवसांपूर्वी दु:खद निधन झाले श्री साईराम अर्बन बँकेचे अध्यक्ष उद्योगरत्न मा.शाहिनाथ विक्रमराव परभणे यांनी बँकेच्या वतीने त्यांच्या कुटुंबियांना ११००० रुपये आर्थिक मदत केली.संस्थेच्या मुख्यकार्यालय येथे मयत खातेदार यांचा मुलगा चि.वाघमारे हनुमान गणेश याना बोलाऊन त्यांचे सांत्वन करून त्यांना ११००० रुपये आर्थिक मदत केली. यावेळी उपस्थित महिला सौ आडाणे ललिता बबनराव, सौ चिंतामणी संगिता राजकिरण, राऊत अनुराधा राजीव, श्री साईराम अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री नवनाथ जाधव साहेब,कर्ज अधिकारी श्री कुलकर्णी शरद सीताराम, प्रशासकीय अधिकारी तळेकर दीपक भागवतराव आदी मान्यवर उपस्थित होते.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button