केजबीड जिल्हा

साळेगाव येथे भररस्त्यात जावायानेच केला सासुचा धारदार कोयत्याने खून !

डोळ्यात मिरची पूड टाकून खून करून मारेकरी त्यांचीच मोटार सायकल घेऊन झाला पसार.!

  • घटनास्थळाला उपविभागीय पोलीस अधिकारी भास्कर सावंत आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांची भेट.

================================

केज,(प्रतिनिधी)

केज तालुक्यातील साळेगाव येथे राज्य महामार्गावर चाळीस वर्षीय सासूचा तिच्या जावायानेच डोळ्यात मिरची पूड टाकून धारदार कोयत्याने मानेवर व हातावर वार करून भर रस्त्यात खून केला आहे. तर त्या महिले सोबतचा एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर अंबाजोगाई येथिल सरकारी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

या बाबतची अधिक माहिती अशी की, धायगुडा पिंपळा ता. अंबाजोगाई येथील लोचना उर्फ सुलोचना माणिक धायगुडे व तिच्या नात्यातील अंकुश दिलीप धायगुडे हे दि.२५ एप्रिल रोजी लोचना हिचा जावई अमोल इंगळे यास भेटण्यासाठी आले होते; परंतु त्यांची भेट झाली नाही. परत जात असताना ते साळेगाव येथील केज-कळंब महामार्गावरील दिलीप मेडकर यांच्या संताजी हॉटेल समोर अमोल वैजिनाथ आला. त्या वेळी त्या तिघात भांडण झाले. त्या नंतर अंकुश धायगुडे यांच्या मोटरसायकलवर बसून लोचना धायगुडे केज मार्गे अंबाजोगाईकडे जाण्यास निघाली. त्या वेळी अमोलने संताजी हॉटेल समोर त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून धारदार कोयत्याने अंकुशच्या हातावर वार केला. या झटापटीत लोचना धायगुडे ही मोटरसायकल वरून खाली पडली. ती खाली पडताच अमोल इंगळे याने तिच्या मानेवर व गळ्यावर धारदार कोयत्याने वार केले. वार चुकविण्याच्या प्रयत्नात लोचना तिच्या डाव्या हातावर देखील चार-पाच खोलवर वार झालेले असून खोलवर जखमा आहेत.
दरम्यान घटनेची माहिती कळताच पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे पोलीस कादरी आणि अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी अंकुश यास नेहुन केज येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक प्रथम उपचार करण्यात आले. यावेळी अंकुश यांनी सांगितले की अमोल इंगळे व त्याच्या सोबत अन्य एक या इसम असल्याची माहिती मिळते.
दरम्यान या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून मयत महिलेचे प्रेत उत्तरीय तपासणीसाठी अंबाजोगाई येथे पाठविले आहे.या आठवड्यातील केज तालुक्यातील हि खुनाची दुसरी घटना असल्याने मारेकऱ्यांना अशा घटना करण्यात अजिबात भिती किंवा कायद्यायाचा धाक राहिलेला नसल्याचे दिसून येत आहे.
अशा घटना करणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी जेणे करून अशा घटना पुन्हा होणार नाहीत. अशी प्रतिक्रिया आता समाजातुन ऊमटत आहेत.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button