गेवराईबीड जिल्हा

गढीच्या शारदा कोरोना केअर सेंटरमध्ये रुग्णांची चांगली सोय -अँड. अजित देशमुख

बीड ( प्रतिनिधी ) गेवराई तालुक्यातील गडी येथे शारदा कोरोना सेंटर चालू झाले असून यामध्ये दोनशे रुग्णांवर उपचार चालू आहेत. आज या केंद्राची पाहणी जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी केली.

विशेष म्हणजे केवळ गढी येथील नाही तर अनेक जन दुरून येथे आले आहेत. यु आकाराच्या बिल्डिंग मूळे वातावरण चांगले असून रुग्णांना हा परिसर उत्साह वर्धक आहे. रुग्ण सेवा करणारे डॉ. गोरे, यांच्यासह केंद्राचे कामात व्यस्त असणारे प्राचार्य राठोड यांच्यासह अन्य लोकांबरोबर या वेळी चर्चा केली.

दोनशे रुग्णांच्या केअर सेंटर मध्ये अनेक लोकांची सोय झाली आहे. ग्रामीण भागातील हजारावर रुग्ण बरे होऊन घरी जातील. त्यामुळे या कोरोना केअर सेंटरचा जनतेला निश्चितच मोठ्या स्वरूपाचा फायदा होणार आहे. यातून ग्रामीण भागातील लोकांचे लाखो रुपये वाचणार आहेत. दुसरीकडे खासगी दवाखान्यातीळ रुग्णांचे वाढते बिल पाहून अनेकांना खर्च झेपेल की नाही ? हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातून अशा सेंटर मुळे नागरिक स्थिरावणार आहेत.

एकीकडे खासगी दवाखान्यांमध्ये लूटमार चाललेली असताना दुसरीकडे अशा सेंटरमुळे लोकांना योग्य उपचार योग्य वेळेत मिळणार आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी राहणाऱ्या रुग्णांनी सेंटरमध्ये कसे राहावे याबाबतचे सर्व नियम पालन करावे, परिसरात स्वच्छता ठेवण्यासाठी कटिबद्ध आडवे आणि त्याचबरोबर आपापसातील अंतर व्यवस्थित राखून लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही देशमुख यांनी केले आहे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button