बीडबीड जिल्हा

पेठबीड भागात जंतुनाशक फवारणीसह जनजागृती करा – गणेश बजगुडे पाटील

बीड / पेठबीड भागात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हळुहळु मोठ्याप्रमाणात वाढत आसुन यावर वेळीच नियंत्रण आणायचे आसेल तर बीड नगरपालिका प्रशासनाने व नगरसेवक, लोकप्रतिनिधी यांनी पेठ बीड भागातील सर्व गल्ली बोळात जंतुनाशक फवारणी व जनजागृती ही प्रत्यक्षात करायला हवी.
बीड शहरातील पेठ बीड हा भाग कायम सर्वच सोयी-सुविधा पासुन वंचित राहिलेला भाग असून या भागामध्ये आठरा पगड जातीतील गोरगरीब कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात राहत असून लॉक डाऊन मूळे आणेकांना कुटुंबाची उपजीविका भागवणे आवघड झालेले आहे. त्यातच याभागात ही कोरोणाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्याच बरोबर शिक्षणाचा अभाव व आर्थिक परिस्थिती गंभीर असल्यामुळे आणेक माय-माऊल्या कोरोनासारख्या महामारीचे गांभीर्य लक्षात नघेता “सर्दी ताप खोकला” यासारखे गंभीर आजार आंगवर काढत आहेत. मरणाच्या भीतीने कोणी किरोनाचे किंवा दवाखान्याचे नाव घ्यायला तयार नाहीत. कोरोना झाला किंवा दवाखान्यात गेलो तर बॉडी सुद्धा भेटत नाही ही भीती आणेकांच्या मनामध्ये घर करून आहे. यातुनच आणेकांच्या जीविताला धोखा निर्माण होवू शकतो. त्यातच बांधकाम कामगार, भाजीपाला विक्रते किंवा छोट्या मोठ्या किराणा व्यवसाईकाकडून मोठ्या प्रमाणात संसर्ग होवू शकतो. म्हणून कसलाही विलंब न करता नगरपालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी तत्काळ पेठबीड भागातील जंतुनाशक फवारणी व जनजागृती करण्यात यावी असे आवाहन शिवक्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश दादा बजगुडे पाटील यांनी केले आहे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button