बीड जिल्हा

‘तेजस अर्बन’ने मयत शेतकरी कुटुंबाला दिला मदतीचा हात

2 लाखाचा धनादेश सुपूर्त, ॲड प्रकाश कवठेकर यांची सामाजिक बांधिलकी

बीड/प्रतिनिधी : कर्जदार शेतकर्‍याचा मृत्यू झाल्यानंतर बीड येथील तेजस अर्बन क्रेडीट सोयटीने त्या शेतकर्‍याच्या कुटुंबाला दोन लाख रूपयांची अर्थिक मदत केली. बँकेचे चेअरमन ॲड प्रकाश कवठेकर यांनी गुरूवारी (दि.29) बँकेत बोलावून मयत शेतकरी कुटुंबाला मदतीचा धनादेश दिला. शेतकरी, कामगार अशा वर्गांना कर्ज देण्यासोबतच दुर्दैवाने काही घटना घडल्यास कर्जदाराच्या अपद्ग्रस्त कुटुंबाला मदतीचा हात देण्याचा आदर्श पायंडाच तेजस अर्बनने पाडला आहे.

पाटोदा तालुक्यातील नायगाव (मयूर) येथील शेतकरी छगन खेडकर यांनी दोन वर्षापुर्वी बीड येथील तेजस अर्बन को. ऑप. क्रेडीट सोसायटी यांच्याकडून एक लाख रूपयांचे कर्ज घेतले होते. शेतातील उत्पन्न निघाल्यानंतर खेडकर यांनी कर्जाची परतफेड केली. दरम्यान 19 मे 2020 रोजी छगन खेडकर हे शेतात काम करत असताना बैलाने त्यांच्यावर हल्ला केला. यात गंभीर जखमी झालेल्या खेडकर यांचा जागीच मृत्यू झाला. दुर्दैवी घटनेत घरातील कर्ता पुरूष गेल्याने मयत शेतकरी खेडकर यांचे कुटुंब अडचणीत सापडले होते. त्यांना दोन मुले असून एकाचे शिक्षण पुर्ण झाले आहे मात्र अद्याप नोकरी नाही. या परिस्थितीत खेडकर कुटुंबाला सावरण्यासाठी मदतीची गरज होती. तेजस अर्बन बँकेने कर्ज देताना खेडकर यांचा दोन लाख रूपयांचा विमा काढला होता. बैलाच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याचे कळताच चेअरमन ॲड प्रकाश कवठेवर यांनी बँकेच्या वतीने विमा कंपनीकडे प्रयत्न आणि पाठपुरावा केला. विम्याची रक्कम मंजूर होताच गुरूवारी (दि.29) कर्जदार मयत शेतकर्‍याची पत्नी संगीता छगन खेडकर व कुटुंबियांना बँकेत बोलावून दोन लाख रूपयांच्या मदतीचा धनादेश सुपुर्द केला. यावेळी बँकेचे चेअरमन ॲड प्रकाश कवठेकर, सचिव रूस्तुम आगेश्‍वर, संचालक शिवाजीराव लोखंडे, रामदास ठोसर, अशोक सुपेकर, दिनेश जाधव, शाखा व्यवस्थापक सचिन घीगे, रतन बहीर, ज्ञानेश्‍वर लोखंडे यांची उपस्थिती होती.
बँकींग क्षेत्रात नावलौकीक असलेली तेजस अर्बन क्रेडीट सोसायटी शेतकरी, कामगार, कष्टकरी, ग्रामीण भागातील युवा उद्योजक यांना कर्ज देण्यासाठी प्रसिध्द आहे. प्रामाणिकपणे काम करणारांना उद्योग- व्यवसायासाठी कर्ज देऊन अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा तेजस अर्बन बँक देते. सभासद, ठेविदार आणि कर्जदारांचे हीत डोळ्यासमोर ठेवून तेजस अर्बनने सामाजिक बांधिलकीही जोपासली आहे. कर्ज देण्यासोबतच दुर्दैवाने काही अघटीत घटना घडली तर कर्जदाराच्या अपद्ग्रस्त कुटुंबाला विम्याच्या माध्यमातून मदत करण्याचा पायंडाच चेअरमन ॲड प्रकाश कवठेकर यांनी पाडला आहे.

विमा काढल्याचे माहित नव्हते
वडीलांनी दोन वर्षापुर्वी शेतीसाठी तेजस अर्बन बँकेकडून एक लाख रूपयांचे कर्ज घेतले. ते खूप प्रामाणिक होते, शेतातील उत्पन्न निघताच त्यांनी कर्जाची परतफेड केली. दरम्यान शेतात काम करत असताना बैलाने केलेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. कर्ज घेताना बँकेने त्यांचा विमा काढल्याचे माहित नव्हते. चेअरमन ॲड प्रकाश कवठेकर यांनी विमा मंजूर होताच फोन करून याची माहिती दिली. अडचणीच्या काळात दोन लाख रूपयांची मदत मिळाली.
-प्रेमचंद छगन खेडकर, मयत शेतकर्‍याचा मुलगा

प्रत्येकाला विम्याची सुरक्षा
कुठलीही वित्तीय संस्था ही सभासद, ठेविदार, कर्जदार यांची असते. संस्थेतील प्रत्येक रूपया ठेविदारांचा असतो. विश्‍वासाने ठेवलेला लोकांचा पैसा बुडला नाही पाहिजे, अनपेक्षीत दुर्दैवी घटना घडल्यानंतर बँकेचा पैसा बुडू नये आणि कर्जदारांच्या अपद्ग्रस्त कुटुंबालाही मदत व्हावी यासाठी प्रत्येक कर्जदाराचा कर्जाच्या दुप्पट रकमेचा आम्ही विमा काढतो. छगनराव खेडकर यांना एक लाखाचे कर्ज देताना त्यांचा दोन लाखाचा विमा काढला होता. त्यांनी पैसे येताच कर्जाची परतफेड केली. यामुळे विम्याच्या पुर्ण रकमेचा लाभ त्यांच्या कुटुंबीयांना मिळाला. मयत शेतकर्‍याच्या अडचणीतील कुटुंबाला मदत केल्याचा आनंद आहे.
– ॲड प्रकाश कवठेकर, चेअरमन तेजस अर्बन क्रेडीट सोसायटी, बीड

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button