गेवराईबीड जिल्हा

गेवराई शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करा अन्यथा आंदोलन करु– वसिम फारोकी

माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी घातले लक्ष

गेवराई  )गेवराई नगर परिषदेच्या गलथान कारभारामुळे गेवराईकरावर पाणी पाणी करण्याची वेळ आली असून गेवराई शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करा अन्यथा तिव्र स्वरूपाचे आंदोलन करु असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर उपाध्यक्ष वसीम फारोकी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. दरम्यान माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी नगर परिषेदेच्या मुख्याधिकारी यांच्याशी बोलून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची सुचना केली आहे.

गेवराई शहरातील तय्यबनगर, संतोषनगर, साठेनगर, इस्लामपुरा, मोमीनपुरा, कोरबु गल्ली यासह शहरातील विविध भागांमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून पंधरा दिवसाला एकदा पाणी पुरवठा होत आहे. रमजानचा महिना सुरु असल्यामुळे मुस्लिम वस्त्यांमध्ये महिलांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. नगर परिषदेतील पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना पाणी सोडण्याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडूनही उडवा-उडवीची उत्तरे दिली जात आहेत. नगर परिषेदेच्या पाणी पुरवठा बाबतच्या अशा गलथान कारभारामुळे नाहक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पाणी पुरवठा सुरळीत करण्या बाबतचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर उपाध्यक्ष वसीम फारोकी व सहकाऱ्यांनी नगर परिषदेमध्ये दिले. पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास महिलांसह नगर परिषेदेसमोर तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील याची नोंद घ्यावी.

या निवेदनावर राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे उपाध्यक्ष सय्यद अल्ताफ, शेख समद, सय्यद अनिस, सय्यद वसीम, शेख अल्ताफ, शेख सलीम, शेख सोहेल, इरफान शेख, शेख हमीद, अलिम पठाण, अमेर पठाण, रफिक शेख, मोसीन शेख, अफरोज पठाण, समीर सय्यद, युसूफ शेख, अझीम मणियार, बशीर मामू शेख, रशीद भाई, अवेज पाठन, समद भाई, राईस मणियार, आकतर भाई, इसाक मणियार, अफरोज पठाण, सय्यद खदिर, लतीफ बागवान, सत्तार पठाण, हमीदभाई, राजू मिरपगार, रामा निकम, राधा किसन, अरुण धापसे, इम्रान अत्तार, इम्रान पठाण आदींच्या सह्या आहेत.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button