बीडबीड जिल्हा

बीड येथील दोन कोरोना केअर सेंटरची अँड. अजित देशमुख यांनी केली पाहणी – आरोग्य यंत्रणा मेहनत घेत आहे

बीड ( प्रतिनिधी ) बीड शहरात शासना मार्फत तीन ठिकाणी कोरोना केअर सेंटर चालू आहेत. त्यापैकी आय.टी.आय. मधील नगर रोडचे एक केंद्र आणि बार्शी रोडला लॉ कॉलेज मधील दुसरे केंद्र या दोन केंद्राची पाहणी जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी केली. या पाहणीच्या वेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नरेश कासट, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय कदम, डॉक्टर बायस, डॉक्टर सारंगकर, डॉक्टर आर्शिया मॅडम, डॉक्टर मोराळे यांचेसह अन्याय हजर होते.

आज कोरोना केअर सेंटर, शासकीय तंत्र निकेतन, बीड येथे तसेच लॉ कॉलेज, बार्शी रोड, बीड या दोन केंद्रांना भेट देऊन पेशंट बरोबर चर्चा केली. डाॅ.कासट सर (ता.वै.अ.बीड ), डाॅ. संजय कदम सर (ता.वै.अ. गेवराई) व डाॅ. बायस सर (सेंटर इंचार्ज), डॉ. सारंगकर, डॉ. आर्शिया मॅडम, डॉ. जाधव मॅडम यांचे बरोबर चर्चा झाली. पेशंट जास्त असताना गेल्या वर्षीपासूनच येथील कारभार चांगला ठेवण्यात या टीमने यश मिळविले आहे. त्यामुळे त्यांचे विशेष अभिनंदन केले.

रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना या दोन केंद्रासह खंडेश्वरी जवळील शासकीय तंत्रनिकेतन मधील तिसरे केंद्र हे देखील उत्तम प्रकारे चालत आहे. रुग्णांना उपचार देण्याबरोबरच मानसिक आधार या केंद्रातील सर्व कर्मचारी देत असल्याने रुग्ण लवकर बरी होण्यास याची मदत होत आहे.

या ठिकाणचे रुग्ण देखील परिसर स्वच्छ राहावा, यासाठी मदत करत असल्याचे दिसले. त्याचबरोबर रुग्ण आपल्या बेडवर असल्याचे दिसून आले. परिसरात रुग्ण फिरत नव्हते, ही या सेंटरची जमेची बाजू होती.

सर्व स्टाफ एकदिलाने काम करत असल्यामुळे एकमेकांना त्याची मदत होते. त्याचबरोबर अशा बाबींकडे रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांचे देखील लक्ष असते. सेंटर चांगले ठरवायचे असेल तर या बाबी महत्त्वपूर्ण ठरत असतात, हे देखील या ठिकाणी महत्त्वाचे वाटले.

जवळपास सातशे रुग्ण या ठिकाणी राहू शकतात. आज रोजी ही केंद्र जवळपास भरलेले होते. त्यामुळे रुग्ण संख्या वाढू नयेत, यासाठी नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक झाले आहे. नाही तर कोरणा ग्रस्तांची संख्या वाढत जाईल. त्यामुळे नागरिकांनी शिस्तीत राहावे.

नागरिकांनी मास्क वापरला पाहिजे. त्याचप्रमाणे सॅनिटायझरचा वापर केला आणि गर्दी टाळली तर प्रत्येक व्यक्ती कोरोना पासून दूर राहू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने आपापली जबाबदारी म्हणून या त्रिसूत्रीचा पालन केले पाहिजे, असे यावेळी डॉक्टर नरेश कासट यांनी मत व्यक्त केले.

कर्मचारी चांगल्या प्रकारे काम करत असल्याने याठिकाणी रुग्णांना मानसिक आधार मिळतो. त्यामुळे अशाच प्रकारची सेवा येथील कर्मचाऱ्यांनी देत राहावी. लवकरच कोरोनाही संपून जाईल. मात्र तुमच्या हाताखालून गेलेले पेशंट तुम्हाला आयुष्यभर विसरणार नाहीत. त्यामुळे आपण चांगली रुग्णसेवा करावी, असे ॲड. देशमुख यांनी यावेळी म्हंटले.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button