बीडबीड जिल्हा

शाहूनगर तांडा जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक संजय रंधवे यांचे दुःखद निधन

गेवराई : तालुक्यातील बंगाली पिंपळा केंद्रातील शाहुनगर तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले संजय यादवराव रंधवे (वय -४५ वर्ष) यांचे एका खासगी रुग्णालयात कोरोनावर उपचारादरम्यान मंगळवारी रात्री दुःखद निधन झाले. तालुक्यातील शैक्षणिक चळवळीत त्यांचे मोठे योगदान राहिलेले असून त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रासह सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
संजय यादवराव रंधवे हे पाथर्डी तालुक्यातील आगसखांड येथील रहिवासी असून ते हल्ली गेवराई येथील माऊलीनगर येथे वास्तव्यास होते. ते तालुक्यातील सुशी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत काही काळ सहशिक्षक म्हणून कार्यरत होते. तर सध्या बंगाली पिंपळा केंद्रातील शाहुनगर तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असल्याने त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. यात त्यांचा रिपोर्ट पाॅझिटिव्ह आला असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. दरम्यान त्यांच्यावर आधार हाॅस्पिटल तसेच नंतर बीड येथील विवेकानंद हाॅस्पिटल येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचे दि.२७ रोजी मंगळवारी रात्री निधन झाले.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तिन मुली असा परिवार आहे. ते सुशी येथील सेवा सोसायटीचे माजी चेअरमन बाजीराव तुरुकमारे यांचे जावई होते.रंधवे कुटूंबीयांच्या दुःखात विश्वरुद्रा परीवार सहभागी आहे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button