जालना

आईचा दहावा वृक्षारोपण करून साजरा परंपरेला फाटा देत भालशंकर परिवाराचा अभिनव उपक्रम

आष्टी / प्रतिनिधी

परतूर तालुक्यातील आष्टी येथील परमेश्वर भालशंकर यांच्या आई गिरजाबाई यांचे नुकतेच निधन झाले होते.त्या अनुषंगाने दहावा साजरा करताने त्यांनी चालत आलेल्या रूढी परंपरेला फाटा देत दि.1 रोजी आईच्या दाहव्याला आपल्या शेतात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजीत केला होता.यावेळी अंबड येथील संत साहित्याचे गाढे अभ्यासक रामेश्वर तिरमुखे यांचे व्याख्यान ही आयोजीत करण्यात आले होते त्यांनी उपस्थितांना अनमोल असे मार्गदर्शन केले, या कार्यक्रमासाठी रामप्रसाद थोरात,अर्जुन थोरात,भगवान कांबळे यांच्यासह भालशंकर कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते.परंपरेला फाटा देत वृक्षारोपणासारख्या केलेले या कार्यक्रमाचे भालशंकर परिवाराचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button