बीडबीड जिल्हाब्रेकिंग न्यूज

बीड जिल्ह्यात 3 दिवसाचा कडक लॉकडाऊन

जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांचे आदेश

१. बुधवार , गुरुवार व शुक्रवार ( दिनांक ०५/०५/२०२१ , ०६/०५/२०२१ व ०७/०५/२०२१ )

या दिवशी केवळ खालील आस्थापना पुर्णवेळ सुरु राहतील .

सर्व औषधालये ( Medical ) , दवाखाने , निदान क्लिनीक , लसीकरण केंद्रे , वैद्यकिय विमा कार्यालये , फार्मास्युटिकल्स , फार्मास्युटिकल कंपन्या , इतर वैद्यकिय आणि आरोग्य सेवा ज्यात सहाय्यक उत्पादन आणि वितरण युनिट तसेच त्यांचे डिलर्स , वाहतुक आणि पुरवठा साखळी , लसींचे उत्पादन व वितरण , सॅनिटायझर्स , मास्क , वैद्यकिय उपकरणे , कच्चा माल युनिट आणि सहाय्य सेवा , पेट्रोल पंप व पेट्रोलियमशी संबंधित उत्पादने , टपाल सेवा इ .

उपरोक्त अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या आस्थापना वगळता इतर कोणत्याही आस्थापना उपरोक्त दिवशी चालू राहणार नाहीत.

२. दुध विक्री केवळ प्रत्येक दिवशी सकाळी ७.०० ते ११.०० वाजेपर्यंत सुरु राहील .

३. गॅस वितरण दिवसभर सुरु राहील .

४. बँकेचे कामकाज प्रत्येक दिवशी सकाळी १०.०० ते दु .१२.०० वाजेपर्यंत अंतर्गत कामकाजासाठी व शासकीय व्यवहारासाठी सुरु राहील .

५. शनिवार व रविवार रोजी ( दिनांक ०८/०५/२०२१ व ० ९ / ०५ / २०२१ )
जिल्ह्यातील सर्व अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या आस्थापना ( किराणा दुकाने , भाजीपाला , फळविक्री , चिकन , मटन विक्रीचे दुकाने , बेकरी व कृषीशी संबंधित इ . ) केवळ ०७.०० ते ११.०० या वेळेत चालू राहतील .

६. तसेच शनिवार व रविवार रोजी ( दिनांक ०८/०५/२०२१ व ० ९ / ०५ / २०२१ ) केवळ हातगाड्यावर फिरुन फळांची विक्री सायकांळी ०५.०० ते रात्री ०७.०० या वेळेत करता येईल .

सदरच्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहील . उपरोक्त आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहिता १८६० ( ४५ ) च्या कलम १८८ , आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल .

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button