बीडबीड जिल्हा

आयटीआय मधील दोनशे चाळीस ऑक्सीजन बेडचे काम अंतिम टप्प्यात – अँड. अजित देशमुख यांनी केली पाहणी

बीड  ) बीड येथील शासकीय तंत्रनिकेतन मध्ये उपचार करण्यासाठी दोनशे चाळीस बेड असलेले ऑक्सिजन कलेक्शन देण्याचे काम प्रगतीपथावर असून अत्यंत नजीकच्या काळात ते पूर्ण होणार आहे. या कामाची माहिती जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी घेतली.

या कामामुळे रुग्णांना मोठा आधार मिळणार असून अनेकांचे जीव वाचवण्यासाठी याचा फायदा होईल, असे यावेळी ॲड. देशमुख यांनी म्हटले आहे.

कोरोना पॉझिटिव रुग्णांवर उपचार करताना आरोग्य प्रशासन काही प्रश्नांचा मुकाबला करताना दिसत आहे. त्यातच ऑक्सिजन बेडची संख्या कमी असल्यामुळे आरोग्य प्रशासनावर ताण येत होता. आता शासकीय तंत्रनिकेतन बीड येथे २४० ऑक्सिजन असलेला दवाखाना चालू झाल्यानंतर यातून रुग्णांना मोठा फायदा होईल, असे यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नरेश कासट आणि डॉक्टर संजय कदम यांनी सांगितले.

आरोग्य यंत्रणा अत्यंत चांगल्या प्रकारे काम करत असून सरकारी आरोग्य यंत्रणेकडून रुग्णांना योग्य उपचार मिळावेत, यासाठी मेहनत घेण्यात येत आहे. या ऑक्सिजन बेड मुळे रुग्णांना लवकर उपचार मिळतील. त्यांचा आजार लवकर बरे होण्यासाठी मदत होईल. सध्या आज अस्तित्वात असलेल्या ऑक्सिजन बेडची संख्या कमी पडत आहे. आणि रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे या ठिकाणाचा फायदा नक्की होणार आहे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button