बीडबीड जिल्हा

आजचा दिवस हा मराठा समाजासाठी काळा दिवस – गणेश बजगुडे पाटील

  • बीड,४२ समाजबांधवांचे आत्मबलिदान व ४० वर्ष मराठा समाजाने शांततेत केलेल्या संघर्षाचा दुर्दैवी क्षण आज याच देही याच डोळा पाहायला मिळाला आहे. आमच्या सारख्या असंख्य समाजबांधवांनी काठ्या लाठ्या जेल भोगले, अनेक आंदोलने केली आणेक गुन्हे दाखल झाले परंतु मराठा आरक्षणाची लढाई कधी शांत होवू दिली नाही. महाविद्यालयीन जीवनापासूनच मी मराठा समाजाच्या चळवळीत सक्रिय झालो व वयाच्या १८/१९ व्या वर्षापासून आजतागायत गेली १७ वर्ष वेगवेगळ्या मार्गाने मराठा आरक्षणाचा विषय तेवत ठेवण्याचे काम केले. मराठा आरक्षणाच्य निकालामुळे समाजाची प्रगती निश्चित झाली असती. आज आरक्षणाच्या निकालाकडे समाज खुप मोठ्या आपेक्षेने डोळे लावून होता. परंतु आजचा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल अन्यायकारक, दुर्दैवी व खेदजनक आसा आहे. आज देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा निषेधार्ह असून राजकारणापायी मराठा आरक्षणाचा खुन झालेला दिसत आहे. आज पर्यंत मराठा आरक्षणाचे राजकीय भांडवल करून अनेक पक्ष पुढाऱ्यांनी समाजाची दिशाभूल केली. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातुन आरक्षण दिले आसते तर निश्चितच टिकले आसते. सर्वच पक्ष व पुढाऱ्यांनी समाजाची दिशाभूल करून कायद्याच्या चौकटीत न बसणारे आरक्षण दिले व त्यास मराठा समाजाचे लोकप्रतिनिधी ही तेवढेच जबाबदार आहेत. येणाऱ्या काळात समाज राजकीय पुढाऱ्यांना बाजूला सारून एक विचाराने एकत्रित येणे गरजेचे आहे. राज्य सरकारची मराठा समाजाला आरक्षण देण्याची इच्छा आसेल तर त्यांनी तत्काळ अधिवेशन बोलवून गायकवाड आयोगाच्या शिफारशी नुसार ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याबाबत ठराव घ्यावा. मराठा समाज खरोखरच मागास झालेला असताना न्यायदेवतेने दिलेल्या निर्णयाचे आम्ही शिवक्रांती संघटनेच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करत असून न्यायदेवतेवरील आमचा विश्वास उडालेला आहे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button