गेवराईबीड जिल्हा

गेवराईच्या कोवीड केअर सेंटरमध्ये घुमले संगीतांचे सुर

प्रा.सुनिल मुंडेंच्या स्वरसंध्या कार्यक्रमाने कोवीड रुग्णांचे मनोरंजन

गेवराई:सध्या सर्वत्र कोरोना बाधीत रुग्ण संख्येत दिवसागणित वाढ होत आहे. कोरोना बाधीत रुग्णांचा ताणतणाव कमी व्हावा यासाठी शारदा कोवीड केअर सेंटर गढी, आणि कस्तुरबा गांधी कोवीड सेंटरमध्ये रुग्णांच्या मनोरंजनासाठी प्रा.सुनील मुंडे निर्मित स्वरसंध्या संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान बुधवारी सुप्रसिद्ध गायक प्रा.सुनील मुंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत सुरेल गीत गाऊन कोविड रुग्णांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न करुन कोवीड रुग्णांचे मनोरंजन केले.यावेळी त्यांना दयानंद कापसे, योग शिक्षक सिद्धार्थ मुनेश्वर यांचे सहकार्य लाभले.
गेवराई तालुक्यातील शारदा कोवीड केअर सेंटर, शिवाजीनगर गढी, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, गेवराई येथील कोविड सेंटर येथे तहसीलदार सचिन खाडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय कदम, वैद्यकीय अधिक्षक डॉ.महादेव चिंचोले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.सुनील मुंडे यांनी कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांसमोर भक्तीगीते, भावगीते, हिंदी, मराठी चित्रपटातील विविध गितांसह देशभक्तीपर गीतं सादर करुन गीतांच्या माध्यमातून रुग्णांचे मनोरंजन केले.रुग्णांनी विविध गीतांंवर ठेका धरत टाळ्यांच्या गजरात त्यांच्या या उपक्रमाला दाद दिली तसेच त्यांचे अभिनंदनही केले. कोविड सेंटरमध्ये घरातील माणसं ही जवळ येऊ शकत नाहीत या काळात प्रा.मुंडे यांनी आम्हाला आनंद दिला, अशा भावना रुग्णांनी व्यक्त केल्या. यावेळी रुग्णाच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून कार्यक्रमाचा उद्देश सार्थक झाल्याची भावना प्रा.सुनिल मुंडे यांनी व्यक्त केल्या.

प्रा.सुनील मुंडे सर यांनी गेवराई येथील कस्तुरबा गांधी कोवीड केअर सेंटर येथील रुग्णाला मानसिक आधार देण्यासाठी सदाबहारदार गीतांचा कार्यक्रम सादरीकरण केला. सर सलाम आपल्या कार्याला
– प्रा.व्हि.यु.राठोड

गेवराई येथील कोवीड सेंटरमध्ये सुप्रसिद्ध गायक प्रा सुनिल मुंडे यांनी विविध गीतांचा कार्यक्रम सादर करुन कोरोना बाधीत रुग्णांचं मनोबल उंचावण्याचा कौतुकास्पद प्रयत्न केला आहे. कोरोना रुग्णांचे मनोबल वाढविण्यासाठी गीतांच्या माध्यमातुन कार्यक्रम सादर करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती.यास सकारात्मक प्रतिसाद देत त्यांना परवानगी देण्यात आली होती त्यांनी सदाबहार गीत सादर करुन रुग्णांचे मनोरंजन केले आहे.
– डाॅ.संजय कदम,तालुका आरोग्य अधिकारी

प्रशासन, डाँक्टर, नर्सेस, पोलीस यांचे कोरोना पार्श्वभूमीवर त्यांचे खुप मोठे योगदान असून ते रात्रंदिवस अविरतपणे कार्य करत आहेत. दरम्यान तालुक्यातील विविध कोव्हिड सेंटरमध्ये शेकडो रूग्ण उपचार घेत असून त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी फुल न फुलाची पाकळी या उक्तीप्रमाणे खारीचा वाटा म्हणून छोटीशी सेवा करत आहे. दरम्यान शहरासह तालुक्यातील सर्वच ठिकाणी संगीत रजनीचे कार्यक्रम सादर करण्यात येणार असल्याचे सुप्रसिद्ध गायक प्रा.सुनील मुंडे यांनी सांगितले.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button