बीडबीड जिल्हा

मराठ्यांचा बीडमध्ये एल्गार

लॉक डाऊन संपल्यानंतर बीड मधुन निघणार पहिला मोर्चा  आ. विनायक मेटे यांची माहिती

बीड (प्रतिनिधी)  आज बीड मध्ये आ. विनायक मेटे यांच्या उपस्थितीत मराठा संघटनांची बैठक संपन्न झाली . या बैठकीमध्ये मराठा समाज आता मूक नाही तर ठोक मोर्चा , आक्रोश मोर्चा लॉक डाऊन संपल्यानंतर बीडमध्ये काढणार असल्याची माहिती बैठकीनंतर आ.विनायक मेटे यांनी दिली आहे . मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाल्यानंतर आता राज्यभरातून मराठा समाजातील प्रत्येकाची प्रतिक्रिया हे अतिशय आक्रमक दिसून येत आहे . यामुळे आता यापुढे होणारे आंदोलन मोर्चे या अतिशय आक्रमक असतील हे यावरून स्पष्ट होत आहे . या पार्श्वभूमीवर आज बीडमध्ये सर्व मराठा संघटनांची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये उद्या पाच प्रमुख व्यक्ती बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांना निवेदन देणार आहेत . यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्या पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण देता येईल त्या पद्धतीने आरक्षण द्यावे परंतु हे आरक्षण तात्काळ देण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे . अन्यथा मराठा समाज राज्यभरात रस्त्यावर उतरेल असा इशाराही यावेळी देण्यात आलेला आहे . या बैठकीमध्ये शिवसंग्रामचे आ. विनायक मेटे , राष्ट्रीय छावा संघटनेचे गंगाधर काळकुटे , सी.ए.जाधव , सुधीर काकडे, सचिन कोटुळे, मनोज जाधव , गणेश मोरे यांसह आदींची उपस्थिती होती . आतापर्यंतचा मराठ्यांचा इतिहास पाहिला तर तो खूप व्यापक आणि लढवय्या राहिलेला आहे . त्यांचेच आजचे वंशज ज्या पद्धतीने आणि ज्या संयमाने लढाई लढत होते तो संयम काल आलेल्या निर्णयानंतर कुठेतरी सुटताना दिसतोय . आज पर्यंतची आरक्षणाची लढाई पाहिली तर ती देखील खूप मोठी राहिलेले आहे तीन दशकाहून अधिक ची ही मागणी काल अमान्य झाली . राज्यातील ५८ मूक मोर्चे आणि देशाचेच नव्हे तर अख्या जगाचे लक्ष वेधणारे मोर्चे . तरुणांची बलिदानं ही सर्व काही धुळीस मिळाली . यामुळे आता राज्यभरात मराठा समाज आक्रमक होत आहे आणि येत्या काळात राज्यभरात मोठा उद्रेक होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही .

 निष्क्रिय अशोक चव्हाण यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करा – आ. विनायक मेटे

सर्वोच्च न्यायालय मध्ये मराठा आरक्षणाच्या सुनावानी दरम्यान सरकार आणि अशोक चव्हाण यांनी योग्यप्रकारे प्रकरण हाताळले नाही. तसेच यात मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे आरक्षण रद्द झाले. हा मराठा समाजासाठी काळा दिवस आहे आणि हा निर्णय समाजाचे भविष्य अंधारमय करणारे आहे. जो पर्यंत न्याय मिळत नाही तो पर्यंत मराठा आरक्षणासाठी चा संघर्ष आपण सुरूच ठेवणार आणि सर्व महाराष्ट्रभर आंदोलने उभी करणार .या लढ्याची सुरुवात आज ७ मे रोजी बीडचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन ८ मे रोजी निदर्शने करून करणार आणि लॉक डाऊन संपल्यानंतर लगेच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार तसेच बीडच्या मोर्चानंतर संपूर्ण राज्यभर जनजागृती करत मोर्चे काढणार आहोत .त्याचबरोबर माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी उगाच राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्याकडे बोट दाखवून वेळ काढू पानाचे काम करू नये आपण स्वतः आणि महाराष्ट्र सरकार काय करणार आहोत हेच जाहीरपणे सांगावे उगाच हात जोडण्याचे नाटक करू नये आणि निष्क्रिय अशोक चव्हाणांची तात्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button