गेवराईबीड जिल्हा

मार्च २०२१ पर्यंत नुतनीकरण असलेल्या शाळेतील कर्मचाऱ्यांचे वेतन सुरु ठेवा

शिक्षक भारती विशेष शाळा कर्मचारी संघटनेची दिव्यांग कल्याण आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी

गेवराई : शासनाने लागू केलेली टाळेबंदी आदेश शिथील होईपर्यंत ज्या शाळेचे मार्च २०२१ पर्यंत नुतनीकरण आहे.अशा सदरील शाळा/ कर्मशाळेतील कर्मचाऱ्यांचे वेतन सुरु ठेवावे अशी मागणी शिक्षक भारती विशेष शाळा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष लहूराव ढोबळे यांनी दिव्यांग कल्याण आयुक्त, आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सद्यस्थितीत कोरोना या संसर्गजन्य रोगाने महाराष्ट्र राज्यात थैमान घातले आहे. त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून महाराष्ट्र शासनाने दिनांक १५/०५/२०२१ पर्यंत राज्यात टाळेबंदची घोषणा केली आहे. तर राज्यातील दिव्यांगाच्या अनुदानित विशेष शाळा/ कर्मशाळांचे नुतनीकरण मार्च २०२१ पर्यंत आहे व पुढील नोंदणी प्रमाणपत्र नुतनीकरण मिळणे बाबतचे प्रस्ताव जिल्हा समाज कल्याण कार्यालयात दाखल आहेत. तसेच जिल्हा समाज कल्याण कर्यालयाकडून ते प्रस्ताव आपल्या दिव्यांग कल्याण आयुक्तालय कार्यालयास ऑनलाईन सादर करण्यात आलेले आहेत. आशा दिव्यांगाच्या अनुदानित विशेष शाळा / कर्मशाळेतील कार्यरत कर्मचाऱ्यांचे वेतन सद्यस्थितीत कोविड १९ चा प्रभाव कमी होई पर्यंत राज्य शासनाने महाराष्ट्र राज्यात लागू करण्यात आलेले टाळेबंदी आदेश शिथील होईपर्यंत राज्यातील दिव्यांगाच्या अनुदानित शाळा / कर्मशाळेतील कर्मचाऱ्यांचे वेतन सुरु ठेवण्यात यावे अशी मागणी संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button