बीडबीड जिल्हा

रमजान ईद करिता १० मे पासून जिल्ह्यातील सर्व बाजार पेठ सुरू करण्याची परवानगी द्या – एआयएमआयएम

बीड  – जिल्हाधिकारी यांनी दिनांक ८ ते १२ मे पर्यंत लावलेला कडक लॉक डाऊन हा रमजानचे रोजेदार आणि व्यापाऱ्यांवर अन्यायकारक असून हा आदेश मागे घेऊन १० मे पासून जिल्ह्यातील सर्व बाजारपेठ रमजान ईद करिता कडक निर्बंधांसह सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी अन्यथा एआयएमआयएम पक्ष व्यापाऱ्यांसह जनतेला न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरून बाजारपेठ उघडी करायला लावेल. असा इशारा पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. शेख शफिक भाऊ यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनातून दिला आहे.
याविषयी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, राज्यासह बीड जिल्ह्यात लॉक डाऊन सुरू आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा म्हणून औषधी, किराणा, भाजीपाला, फळ, बेकरी, मिठाई इत्यादींना सकाळी ०७.०० ते ११.०० आणि संध्याकाळी ०५.०० ते ०७.०० वाजेपर्यंत लॉक डाऊन मधून शिथीलता देऊन विक्रीस परवानगी देण्यात आली होती. परंतु पुन्हा एकदा ०५ ते ०७ मे पर्यंत औषधी दुकाने वगळता बाकीच्या सर्व दुकानांना कडक लॉक डाऊन च्या अंतर्गत बंद ठेवण्याचे आदेश आपण दिले होते. त्याचे जिल्हाभरातील व्यापाऱ्यांनी योग्य प्रकारे पालन केले. तरीसुद्धा आपण ०८ ते १२ मे पर्यंत पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन चे आदेश निर्गमित केले. या आदेशामुळे पवित्र रमजान चे रोजेदार तसेच येत्या १३ किंवा १४ मे ला साजरी करण्यात येणारी ईद वर याचे अनिष्ट परिणाम होणार आहेत. तरी आपण या आदेशाचा आणि तारखांचा पुन्हा एकदा पुनर्विचार करावा आणि १० मे पासून फक्त अत्यावश्यक सेवाच नाही तर सर्व प्रकारचे व्यापार उदीम ची दुकाने निदान रमजान ईद पर्यंत तरी कडक निर्बंधासह सुरू करण्याची परवानगी द्यावी. अशी या निवेदनाद्वारे आपल्याकडे नम्र विनंती करण्यात येत आहे. लॉक  डाऊन मुळे आधीच त्रस्त असलेल्या व्यापारी वर्गासह मुस्लिम समाजाचा अंत न पाहता इस्लाम धर्माच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा व सर्वात मोठा पवित्र महिना म्हणून रमजान व ईद साजरी करण्यात येते. त्याला आपण चुकीच्या पद्धतीने लावलेल्या कडक लॉक डाऊन मुळे खोडा घालू नये. अन्यथा व्यापारी आणि जनतेच्या हितासाठी एआयएमआयएम पक्षाला रस्त्यावर उतरून बाजार पेठ उघडे करावे लागेल. तरी कृपया कायदा हातात घेण्याची वेळ आमच्यावर आणू नये. अशी विनंती ही जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनावर शेख शफीख भाऊंसह नगरसेवक शेख मतीन, हाफीज अशफ़ाक़ साहाब, अज़हर मोमीन, एजाज़ खन्ना भैय्या, मुफ़्ती वाजेद अशरफ़ी साहब आदींचे नावे व सह्या आहेत.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button