बीड जिल्हामाजलगाव

माजलगाव येथील तीन कोरोना केअर सेंटरला भेटी देऊन केली पहाणी – जनतेने आजार लपवू नये – अँड. अजित देशमुख

बीड  ) माजलगाव येथील दोन कोरणा केअर सेंटर आणि एका कोरणा हॉस्पिटलला आज जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मधुकर घुबडे, डॉक्टर गरुड यांचे सह अन्य हजर होते. यावेळी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधण्यात आला. चर्चेमुळे त्यांना समाधान वाटले.

या पाहणी मधून एक मुद्दा समोर आला तो जनतेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्यांना आजाराची लक्षणे दिसली, ज्यांनी लगेच तपासले आणि जे पॉझिटिव निघाले, केअर सेंटर मध्ये ताबडतोब आले, ते लगेच बरे होऊन घरी गेले. हे मात्र लक्षणे दिसूनही आजार लपवतात आणि दुखणे अंगावर काढतात, त्यांचा स्कोअर वाढत जातो, ते हतबल होतात. त्यामुळे जनतेने आजार लपवू नये, असे अँड. अजित देशमुख यांनी म्हटले आहे.

माजलगाव येथील तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड, माजलगाव या संस्थेतर्फे आय. टी. कॉलेजमध्ये कोरणा केअर सेंटर चालवण्यात येते. रुग्णांची देखभाल आरोग्य विभाग करत असताना रुग्णांना आवश्यक असलेल्या सर्व सुविधा संस्थेमार्फत चांगल्या प्रकारे उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे या ठिकाणच्या रुग्णांमधे समाधान दिसत होते. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शहाजी शेजुळ, त्याप्रमाणे अशोक मगर, सुमंत शेंडगे यांचेसह अन्य टीम या ठिकाणी कार्यरत आहे.

कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी अपुरी यंत्रणा असतानाही चांगल्या प्रकारे काम करत आहे. या यंत्रणेवर अधिकचा ताण पडू नये म्हणून जनतेने कोरोणाची साखळी तोडण्यासाठी सज्ज झाले पाहिजे. प्रत्येकाने शासनाने घालून दिलेले नियम पाळले तरच हे शक्य होणार असल्याचेही देशमुख यांनी यावेळी म्हटले

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button