बीडबीड जिल्हा

बीडमध्ये मराठा बांधवाची वज्रमूठ

आरक्षणासाठी आरपारची लढाई,आता मूक नव्हे ठोक मोर्चा

बीड:-मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात रद्द करण्यात आल्याबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यात आली . आतापर्यंत समाजाने ५८ मूक मोर्चे काढले , ४२ बांधवांचे बलिदान दिले तरीही सरकारला आणि न्यायालयाला याची दखल घ्यावी वाटली नाही . त्यामुळे आता मराठा आरक्षणासाठी मूक नव्हे तर आक्रमक पणे ठोक मोर्चे काढण्याचा निर्णय मराठा आरक्षणासाठी बीडमध्ये
शनिवारी ( दि . ०८ मे ) रोजी पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला . आरक्षणासाठी मराठा समाजाने बीडमध्ये वज्रमुठ आवळल्याचे दिसून येत आहे . या बैठकीला विविध सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी व मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक उपस्थित होते . मराठा आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने नाकारले आहे , यामुळे प्रत्येक मराठा बांधवाला हा मोठा धक्का बसला आहे . मराठा समाजातील सर्वजण श्रीमंत नाहीत . मोलमजुरी करणे , मुंबईत माथाडी काम करणे , अशी कामे ते करत आहेत . त्यांना स्वत : चे घर नाही . म्हणून ते मिळेल त्या झोपडीत राहतात . मराठा समाजातील अनेक कुटुंबांची अवस्था अत्यंत दयनीय आहे . मराठा समाजाचा राज्यकर्ते केवळ मतासाठी वापर करत आहेत , त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारणे हात न झटकता राज्य आणि केंद्र सरकारची जबाबदारी असून त्यांनीच मराठा समाजाला आरक्षण द्यावे . आता आरक्षणासाठी मराठा समाज आरपारची लढाई लढणार आहे . यासाठी बीडमध्ये समाज बांधवाची बैठक पार पडली .
यावेळी आरक्षण लढ्याची पुढील दिशा ठरवण्यात आली . या बैठकीला प्रा.सचिन उबाळे , गंगाधर काळकुटे , किशोर पिंगळे , अॅड.महेश धांडे , शैलेश जाधव , गणेश बजगुडे , विजय लव्हाळे , ॲड.शशिकांत सावंत , भाऊसाहेब डावकर , संदिप उबाळे , संतोष जाधव , युवराज मस्के , विठ्ठल बहिर , बालाजी पवार , आंकुश देखमुख , नितिन डिसले , गणेश माने , किशोर गिराम यांच्यासह विविध सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी व मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक उपस्थित होते .

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button