बीडबीड जिल्हा

मराठा समाजातील युवकांनी पुढाऱ्यांच्या चपला उचलायचे धंदे बंद करावेत

मोंढ्यात जाऊन हमाली करा पण यांची गुलामी करू नका

  • परखड-अशोक होळकर-9130117000

मराठा समाजातील तरुण अमका आमचा नेता तमका आमचा नेता,यातच धन्यता मानताना दिसून येत आहे ही परिस्थिती भले ही मराठा समाज बहुसंख्य असल्याने मराठा तरुण वर्ग नक्कीच जास्त  निदर्शनास येत आहे परंतु इतर समाजातील देखील तरुण पुढाऱ्यांच्या मागे उदोउदो करत फिरून आणि त्यांचे खेटरं उचलून आयुष्यातील खरे कमविण्याचे दिवस बरबाद करू लागली आहेत कुटुंबातील लोकांचे कष्ट विसरून ,आपण मात्र पुढाऱ्यांच्या पाठीमागे जय करत फिरतो ,घरात एखादी वस्तू कमी पडली तर तुम्हाला तुमचा पुढारी देतो का ,शेवटी कष्ट करूनच ती वस्तू खरेदी करावी लागते याचेच भान आपण विसरतो ,हेच वय असतं याच वयात आपण काहितरी कमवू शकतो,चार पैसे घरी आणून आई वडिलांना हातभार लावू शकतो,परंतु कष्ट करण्याची क्षमता कमी झाल्याने आणि नेत्यांच्या पाठीमागे गर्दीत एखादा जवळ फोटो काढून तोच फोटो सोशल मीडियावर ढकलायचा त्यामुळे सोशल मीडियावर जास्त ओळखी झाल्याने कामाची लाज वाटू लागली हीच आमची शोकांतिका आहे,आभासी दुनियेत जगण्यात धन्यता मानून पोट भरत नसतं, याचं भान मराठा समाजातील तरुणांनी ठेवलं पाहिजे कोणत्याही प्रकारची कामे करा,आणि आई वडिलांना सांभाळा त्यांचे कष्ट डोळ्यासमोर ठेऊन ,त्यांनी आपल्या साठी केलेला संघर्ष आठवून त्यांना वृद्ध पणात आरामात ठेवण्यासाठी आजच चार पैसे कमावण्याची सवय लावने ही काळाची गरज आहे, त्यासाठी प्रत्येक तरुणांनी शिक्षण पूर्ण झाल्यावर आणि नौकरीची जर शक्यता नसेल तर त्यांनी इतर कामात व्यर्थ वेळ न घालता छोट्या मोठ्या उद्योगाकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे नसेल उद्योग व्यवसायासाठी पैसे तर मोंढ्यात जाऊन हमाली करा परंतु राजकारण्यांच्या हातचे बाहुले बनून वैचारिक गुलाम बनू नका ,कोणताच नेता तुम्हाला मोठं होऊ देणार नाही, त्यांच्या स्वतःच्या संस्थेवर विनामुल्य नौकरी देणार नाही ,तुम्ही जर त्यांचे निष्ठावान असाल तर घ्या म्हणावं संस्थेवर नौकर, क्लार्क ,शिक्षक कुठल्याही पदावर ,घेतो का पैसे न भरता ते पहा मग त्यांच्या चपला जोडे उचला .

तरुणांनी प्रथम शिक्षणाला महत्व देऊन शिक्षण पूर्ण करून नौकरीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे गुणवत्ता असेल तर नौकरी मिळू शकते,नौकरी मिळाली नाही म्हणून निराश न होता शिक्षणाचा फायदा एखाद्या चांगल्या उद्योग व्यवसायासाठी होऊ शकतो उद्योगात देखील मोठे नाव लौकिक मिळू शकते उद्योगासाठी भांडवल नसेल तर कोणाच्या दुकानावर अथवा कंपनीत अथवा इतर कुठल्याही ठिकाणी काम करून अनुभव आणि पैसे मिळवू शकता आणि त्यातून छोटा मोठा उद्योग का होईना उभारू शकता आणि आपल्या आईवडिलांना आर्थिक हातभार लावू शकता परंतु ही तळमळ युवकांमध्ये दिसून येते का?हाच खरा प्रश्न आहे शिक्षण संपले नौकरी लागत नाही शेतात काम करू शकत नाही मग कोण्यातरी पक्षाचा झेंडा उचलून युवा नेत्याच्या पाठीमागे आईवडिलांच्या कमाईवर कडक पांढरेशुभ्र कपडे घालून जय जय करत फिरायचे ,आणि पुन्हा चारसहा महिन्यात कोण्यातरी पदाची निवड होते आणि पेपरात निवडीचे फोटो छापून आले की झाले गल्लीतील किंवा शहरातले युवा नेते आणि येथूनच सुरू होते आयुष्याचं वाटोळं व्हायला 24 तास ऑनलाईन राहून आमचं दैवत आमचं काळीज खंबीरसाथ ,आमचं हृदयस्थान, म्हणून आईबापांच्या जीवावर बसून खायचं आणि नेटप्याक सुद्धा त्यांच्याकडूनच घ्यायचं आणि गुणगान मात्र राजकरण्याचं गायचं असली दळभद्री औलाद ज्या आईबापांच्या पोटाला असेल तर काय अपेक्षा ठेवायची यांच्याकडून खुशाल कामधंदा सोडून आणि फुकटचं पेट्रोल जाळून नेत्यांच्या मागे उदोउदो करत फिरताना 20ते 30 च्या आतील तरुणाई दिसत आहे सुशिक्षित बेरोजगारी खूप वाढली असून तरुणांच्या हाताला कामे नाहीत म्हणून एकीकडे आपण ओरडतो रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या पाहिजेत म्हणून आपण मागण्या करतो परंतु त्या रोजगाराच्या संधी आज तरी कोण्या पुढाऱ्यांच्याकडून पूर्ण होतील ही अपेक्षाच मुळात चुकीची वाटू लागली आहे या तरुणांच्या हाताला काम देऊन यांचे झेंडे कोण उचलतील ?यांच्या मागे कोण फिरणार राजकारणात घराणेशाही आहे तिथे तुमच्या आमच्या सारख्याला कोणी विचारत नाही, आणि कार्यकर्ता मोठा करू कोणालाच वाटत नाही त्यासाठी तरुणांनी आयुष्यातील अनमोल दिवस वाया न घालवता छोटा मोठा स्वतःचा उद्योग व्यवसाय उभारावा आणि काबाड कष्ट करणाऱ्या आपल्या आईवडिलांना आर्थिक हातभार लावून कुटूंब सुधाराव आणि नंतर राजकारणाची आवड असेल तर निवड करावी राजकारण करावं परंतु कमविण्याचे वय एकदा निघून गेले तर आयुष्याची बरबादी होते याचे भान ठेवणे गरजेचे आहे ,मराठा समाजातील युवक राजकारणात खूपच गुरफटून गेला असल्याने पांढरे शुभ्र कपडे घालून ,कामधंदा सोडून खुशाल उदोउदो करत फिरत असल्याने अधोगतीचा मार्ग डोळ्यासमोर असतांना देखील त्याच मार्गावर वाटचाल करत असतील तर यांना रोखणे जरा कठीणच म्हणावे लागेल.

किती पुढाऱ्यांचे मुलं आंदोलन करून जेलात गेले? मग तुमची अक्कल गहाण ठेवली का?
कोणत्याही प्रकारचे आंदोलन असुद्या कोणता नेता स्वतःच्या मुलाला आंदोलन मोर्चात सहभागी करून त्याच्यावर गुन्हे दाखल करायला लावतो का? आंदोलन मोर्चे ,बोगस मतदान , भांडण तंटे करायला ,निवडणुकीत दारू ,प्रचार करायला घराबाहेर पडायला आपण ,त्यांचे मुलं गेट च्या आत अभ्यासात मग्न आणि हे बेनं अर्धी ढकलून फिरतय नग्न ,इतके कसे मानसिक गुलाम झाले खरंच अक्कल गहाण ठेवल्यासारखे वागू लागल्याने असा संताप आजची परिस्थिती पाहून होणार नाही म्हणजे नवलच नाही का?आता आरक्षण नाही, याचे परिणाम ओळखून तरी जागे होणे गरजेचे आहे अन्यथा अत्यंत बिकट परिस्थितीशी सामना करावा लागेल याचे भान ठेवने गरजेचे आहे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button