गेवराईबीड जिल्हा

भेंड खुर्द येथे कोरोणा बाधितांच्या निवासाची अँड. अजित देशमुख यांनी केली पाहणी

गेवराई ( प्रतिनिधी ) गेवराई तालुक्यातील भेंड खुर्द ( शिंदे ) या गावामध्ये कोरोना बाधित सापडले. या कोरोना बाधितांची गावातच सोय करण्याच्या उद्देशाने गावातील भूमिपुत्र प्रतिष्ठानचे कोरोणा केअर सेंटर काढून उपचार देण्याची व्यवस्था केली. तालुक्याच्या आरोग्य खात्याने या ठिकाणी वैद्यकीय व्यवस्था आणि औषधी उपलब्ध करून दिल्याने गावातील रुग्णांना गावातच राहणे सोपे झाले आहे.

भेंडी खुर्द या गावात भूमिपुत्र प्रतिष्ठान या नावाने काही युवकांनी एकत्र येऊन सामाजिक काम चालू केले आहे. भूमिपुत्रने गावात पन्नास कोरोना बाधितांसाठी कोरणा केअर सेंटर काढले. या ठिकाणी तीस पेशंट दाखल झाले. या सर्वांची प्रकृती सुधारत आहे.

कोरोना लक्षण दिसले की, लगेच तपासला तर अतिशय साधा आजार आहे. तो गावातल्या गावात बरं होऊ शकतो. कोरोना केअर सेंटर वर रुग्ण बरा होण्यासाठी कसलाही खर्च येत नाही. मात्र अंगावर दुखणे काढून जर आजार रुग्णचं वाढवून घेत असेल तर मात्र त्या रुग्णाला कोरोणाचा त्रास होतो आणि लाखो रुपये खर्च करून बरे व्हावे लागते.

याठिकाणी भूमिपुत्र प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांसह रुग्णांशी आणि आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांशी देखील चर्चा करण्यात आली. गावात आणखी रुग्णांची तपासणी करण्यासाठी अँटीजन किटची आवश्यक असल्याची बाब आरोग्य खात्याला कळविण्यात आली असून आता बाधित रुग्णांच्या परिवारातील आणि त्यांचे संपर्क आलेल्या सर्वांचे पुन्हा एकदा तपासणी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे भूमिपुत्र ने घेतलेल्या पुढाकाराचे अँड. अजित देशमुख यांनी कौतुक केले आहे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button