पाटोदाबीड जिल्हा

डोंगरकिनी येथे अँड. अजित देशमुख यांच्या उपस्थितीत अंटीजेन किट व औषधाचे वितरण

- आ. सुरेश धस यांच्या चाळीस हजार किट कामी येतील

डोंगरकिनी ( प्रतिनिधी ) पाटोदा तालुक्यातील डोंगरकिनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात काल आमदार सुरेश धस यांच्या तर्फे प्राप्त झालेल्या चाळीस हजार अँटीजन तपासणी किट पैकी काही किट देऊन तपासणीचा शुभारंभ जन अँड. अजित देशमुख यांनी केला. तर यानंतर डोंगरकिनी येथिल कोरोना केअर सेंटरला मोफत औषधांचे वितरण देखील करण्यात आले.

जिल्ह्यात अंटीजेन किटची कमतरता भासत असल्यामुळे आमदार सुरेश धस यांनी मच्छिंद्रनाथ गडाच्या माध्यमातून आष्टी, पाटोदा आणि शिरूर तालुका साठी चाळीस हजार तपासणी किट प्रशासनाला उपलब्ध करून दिल्या. या किटच्या माध्यमातून डोंगरकिनी येथे तपासणीचा शुभारंभ ऍड. अजित देशमुख यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

यावेळी त्यांनी उपस्थित रुग्ण यांच्याशी संवाद साधताना कोणतेही लक्षण दिसले आणि लगेच तपासणी केली तर कोरोणाची भीती नाही. त्यामुळे लक्षण लपवू नका. परिसरातील कोणी आजारी दिसला तर त्याला लगेच तपासणीला पाठवून तपासून घ्या. आणि परिसर कोरोणा मुक्त ठेवण्यासाठी मदत करा, असे आवाहन केले.

आमदार धस यांनी दिलेल्या या किट आणि वाटप केलेली औषधे कोरोणा रुग्णांसाठी वरदान ठरणार असून या माध्यमातून चाळीस हजार तपासणी झाल्यानंतर रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात घटणार आहे. मोफत औषधे देखील कोरोना केअर सेंटरला देशमुख यांच्या हस्ते देण्यात आले. त्यामुळे आम. धस यांचे हे काम उल्लेखनीय असल्याचेही देशमुख यांनी म्हटले.

या कार्यक्रमाच्या वेळी जिल्हा परिषद सदस्य माऊली जरांगे, अनिलशेठ पवार, माजी सरपंच राजेंद्र येवले, यांच्यासह अन्य उपस्थित होते. त्याचप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि कोरोणा केअर सेंटर वरील काम पाहणारे डॉक्टर मोरे यांच्यासह त्यांची सर्व टीम देखील यावेळी उपस्थित होती. आरोग्य यंत्रणेने रुग्णांना धीर देऊन चांगली सेवा द्यावी, असेही देशमुख यांनी यावेळी म्हटले.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button