बीडबीड जिल्हा

जिओ च्या दवाखान्यात जिंदगीचा जन्म डॉ कृष्णा राऊत दत्त ठरलात

कै सुशेन काकडे मेमोरियल व जिओ जिंदगी कडून जरूड फाटा ता बीड येथे मोफत दवाखाना सुरू आहे डॉ कृष्णा राऊत व जालिंदर काकडे , सचिन कुटे , महेश काळे 24 तास सेवा देत आहेत . शिवणी येथील बहीण पद्मा विजय गोरे यांना तपासणी साठी आणण्यात आले गरोदर मातेला ऐनवेळी कळा सुरू झाल्या , हल्ली नॉर्मल डिलिव्हरी होत नाही , मात्र नियतीला जणू डॉ राऊत यांची परीक्षाच घायची असावी , धांदल उडाली मात्र निर्णय झाला कुठेही जायचे नाही अन हातात वेळ ही नाही . शर्थीचे प्रयत्न सुरू झाले आणि जिंदगी प्रसूत झाली अन जालू चा फोन आला जिंदगी जिंकली साहेब .

काय असतो ओ समाधान यापेक्षा वेगळं काही नसतं माणसं म्हणूम सिद्ध होण्याची सुवर्ण संधी कोरोनाने दिली आहे डोक्यावर ऊन घेऊन जिओ धावते आहे . जन्मेलेलं बाळ नशीबवाण आहे , जिओ च्या मोहिमेच बाळस या पेक्षा वेगळं आणि सुंदर असूच शकत नाही . घाबरू नको बाळा तुझा मामा तिथे आहे तो बघ जिओ चा जालू ….

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button