गेवराईबीड जिल्हा

रुग्ण कल्याण समितीच्या एका फोनवर केंद्रेकरांनी गेवराई रुग्णालयाची घेतली झाडाझडती

कामचुकरपणा करणाऱ्यांना घेतले फैलावर

गेवराई (प्रतिनिधी) : ऑक्सिजन अभावी सुमारे ६४ रुग्णांचे जीव टांगणीला लागल्याचा निरोप रुग्ण कल्याण समिती कडून विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना देताच यंत्रणा हलली आणि रुग्णांचे जीव वाचले, समितीच्या एक फोनवर केंद्रेकर यांनी थेट गेवराई येथे रुग्णालयातील सुविधांचा आढावा घेतला, कामचुकारपणा करणाऱ्यांची कठोर शब्दात कानउघाडणी करून आवश्यक सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी प्रशासनाला आदेश दिले. केंद्रेकर यांच्या भूमिकेचे गेवराई मधील नागरिकांनी कौतुक केले.

गेवराई तालुक्यातील कोरोना रुग्णांना दिलासा देण्यासाठी रुग्ण कल्याण समिती स्थापन करण्यात आली आहे. रुग्ण कल्याण समिती कडून कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध करून देणे तसेच इंजेक्शन सह अनेक अडीअडचणी सोडविण्याचे काम होत आहे. मंगळवार दि ११ रोजी ऑक्सिजनचा तुटवडा झाल्याची माहिती या समितीला समजली त्या नंतर या समितीने स्थानिक अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला मात्र यश आले नाही, महेश दाभाडे यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन थेट आयुक्त केंद्रेकर यांना फोनवर सर्व माहिती दिली, त्यानंतर यंत्रणा हलली आणि ६४ कोविड रुग्णांना ऑक्सिजन मिळाला. यावेळी समितीच्या वतीने गेवराई उपजिल्हा रुग्णालयातील गैरसोय, कर्मचाऱ्यांची रिक्त पदे, असुविधा आदी बाबी आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या, या माहितीची गंभीर दखल घेऊन केंद्रेकर यांनी घेतली, रुग्ण कल्याण समितीच्या एका फोनवर त्यांनी आज उपजिल्हा रुग्णालय येथे भेट दिली.

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी ऑक्सीजन तुटवड्याची गंभीर दखल घेतली, या भेटीत त्यांनी समितीच्या वतीने कळविण्यात आलेल्या मुद्द्यावर चर्चा केली, यापैकी अनेक विषय त्यांनी तात्काळ मार्गी लावण्याच्या आदेश दिले, तर कामचुकार अधिकार्‍यांना चांगलेच फैलावर घेऊन नियोजन पद्धतीने कामे करा नसता घरचा रस्ता दाखवेल असा इशारा देखील या बैठकीत सुनील केंद्रेकर यांनी दिला. केंद्रेकर यांच्या भेटीबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी रुग्ण कल्याण समितीने लेखी निवेदन दिले.

या वेळी समितीचे महेश दाभाडे , ऍड . निकम, संजय काळे ,राजेंद्र बरकसे, प्रशांत गोलेच्छा, संदीप मडके, बाळासाहेब सानप, दादासाहेब घोडके, प्रशांत घोटणकर, प्रताप खरात, हरेश मनगरमणी आदी सह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्तित होते .

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button