बीडबीड जिल्हा

बीड जिल्ह्यात पुन्हा दहा दिवसाचा कडक लॉकडाऊन

बीड :- जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिनांक 15 मे ते 25 मे या कालावधीत कडक लॉकडाऊन करण्याचे आदेश आज दुपारी काढले आहेत . दहा दिवसाच्या कालावधीत वैद्यकीय सेवा वगळता सर्व प्रकारच्या आस्थापना पूर्ण वेळ बंद राहणार आहेत.सदरील आदेश शनिवारी दि .15 मे रोजी रात्री 12 पासून लागू होणार असल्याचे आदेशात म्हटले आहे . जिल्हाधिकारी यांच्या आदेशात म्हटले आहे की , दिनांक 15 मे 2021 रोजीचे रात्रीचे 12 वाजेपासून ते 25 मे 2021 रोजीचे रात्रीचे 12 वाजेपर्यंत खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे . १ ) . दिनांक १५.०५.२०२१ रोजीचे रात्रीचे १२.०० वाजेपासून ते २५.०५.२०२१ रोजीचे रात्रीचे १२.०० चे या दरम्यान केवळ खालील आस्थापना पूर्णवेळ सकराहतील . सर्व औषधालये ( Medical ) , दवाखाने , निदान क्लिनीक , लसीकरण केंद्र , वैद्यकिय विमा कार्यालये , फार्मास्युटिकल्स , फार्मास्युटिकल कंपन्या , इतर वैद्यकिय आणि आरोग्य सेवा ज्यात सहाय्यक उत्पादन आणि वितरण युनिट तसेच त्यांचे डिलर्स , वाहतुक आणि पुरवठा साखळी , लसीचे उत्पादन व वितरण , सेनिटायझासं , मास्क , वैद्यकिय उपकरणे , कच्चा माल युनिट आणि सहाय्य सेवा , पट्रोल पंप व पेट्रोलियमशी संबंधित उत्पादने . टपाल सेवा इ . उपरोक्त अत्यावश्यक सेवेत मोडणान्या आस्थापना वगळता इतर

कोणत्याही आस्थापना उपरोक्त विवशी चालू राहणार नाहीत . २ ) दुध विक्री केवळ प्रत्येक दिवशी सकाळी ०७.०० ते १०.०० वाजेपर्यंत सुरु राहील , ३ ) गैस वितरण दिवसभर सुरु राहील . ४ ) बैंक / ग्राहक सेवा केंद्र यांचे कामकाज प्रत्येक दिवशी सकाळी १०.०० ते दु .०१.०० वाजेपर्यंत केवळ शासकीय व्यवहार , पेट्रोलपंप व गैस एजन्सी धारकांचे व्यवहार , ची निविष्ठांशी संबंधित व्यवहार , वैद्यकिय कारणास्तव केले जाणारे व्यवहार , सर्व शासकीय योजनेचे लाभार्थी यांचे वेतनाबाबतचे व्यवहार , अत्यावश्यक सेवेशी संबंधित असणा – या आस्थापना यांना या वेळेत बैंकेत जाऊन व्यवहार करण्यास मुभा असेल.दरम्यानच्या काळात एटीएम कैशच्या वाहनांना परवानगी असेल . तसेच दुपारी ०१.०० ते ०४.४५ वाजेपर्यंत बँकेचे कर्मचारी यांना केवळ अंतर्गत कामकाजास मुभा असेल , शासकीय कार्यालये नियमित वेळेप्रमाणे सुरु राहतील . ( ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक असेल . ) १. लसीकरणा करीता ४५ वर्षावरील ज्या व्यक्तीचा दुसरा डोससाठी मॅसेज आला आहे . त्यांनाच लसीकरणचा डोस घेण्यासाठी जाण्यास मुभा असेल ( लसीकरणासाठी आलेला मेसेज / आरोग्य विभागाचे पा , आधार कार्ड सोबत असणे आवश्यक असेल ) ७ ) कृषी व्यवसायाशी संबंधित बि – बियाणे , खते , औषो गांधी जी दुकाने आहेत त्या दुकान मालकास आलेले वि बियाणे , खते , औषधे केवळ गोडाऊनला किंवा दुकानामध्ये उतरुण घेण्यास मुभा असेल , ८ ) नरेगाची कामे सुरु राहतील . या ठिकाणी सामाजिक अंतर , मास्क , सैनिटायझर चा व कोविड १ ९ विषदक जे नियम आहेत ते पाळणे

बंधनकारक असेल ९ ) स्वस्त धान्य दुकानदार यांनी दिनांक १६.०५.२०२१ ते २०,०५ , २०२१ या कालावधीत केवळ गोडाऊन ते स्वस्त धान्य दुकान किंवा गोडाऊन या ठिकाणी माल उतरुण घेणे व दिनांक २१.०५.२०२१ पासून सकाळी ७.३० ते ११.०० मा वेळेतच लाभाध्यांना धान्य वितरण करण्यास मुभा राहील , ( राशनसाठी जाणा – या व्यक्तींच्या सोचत राशनकार्ड , आधार कार्ड असणे आवश्यक आहे . ) १० ) जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या मद्यविक्री अनुज्ञप्त्या पूर्णवेळ पूर्णपणे बंद राहतील . दिनांक १५/०५/२०२ ९ रोजीचे रात्रीचे १२.०० वाजेपासून ते २५/०५/२०२१ रोजीचे रात्रीचे १२.०० वाजेपर्यंत या कालावधीत अन्य असलेल्या आस्थापना चालू असल्याचे निदर्शनास आल्यास त्या सिल करण्यात येऊन त्यांचा परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल । सदरच्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस यंत्रणा आणि सर्व संबंधित विभागाची राहील असे आदेशात म्हटले आहे .

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button