बीडबीड जिल्हा

जिओ जिंदगीचा फिरता दवाखाना…..भाकरीचा दवाखाना..

जिओ जिंदगीचा फिरता दवाखाना…..भाकरीचा दवाखाना..

गेल्या वर्षी बीड तालुक्यातील 135 गावांमधून भुकेल्यांची भूक भागविण्यासाठी भरभरून भाकरी देण्यात आल्या होत्या. यावर्षी ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार प्रचंड प्रमाणात वाढत असताना जिओ जिंदगीच्या वतीने भाकरीचा दवाखाना या नावाखाली फिरत्या दवाखान्याची सुरुवात करण्यात आलेली असून आज निर्मळवाडी, कारळवाडी, हिवरापहाडी, दामोदरवाडी, सतवाडी या ठिकाणी आरोग्य शिबीर घेण्यात आले. ऑक्सीमीटर, रक्तदाब तपासणी, ताप आदींच्या माध्यमातून तपासणी करण्यात आली. लक्षणानुसार औषधोपचार करण्यात आले. ज्या रुग्णांना कोरोनसंबंधी लक्षणे दिसत आहेत त्यांना तात्काळ शासकीय रुग्णालय किंवा यथायोग्य ठिकाणी उपचार घेण्याबाबत सूचना करण्यात आल्या. सचिन घोरड यांनी आज आपला अमूल्य वेळ काढत एकदिवसीय सेवा दिली. पहिल्याच दिवशी 5 गावांमधील 250 पेक्षा अधिक लोकांवर उपचार करण्यात आले. यावेळी आजचे सारथ्य बर्थडे बॉय व आर्यन फाउंडेशनचे राम फालके यांनी केले. जिओ जिंदगीचे लोकपत्रकार भागवत तावरे सर, भास्कर ढवळे सर, मुक्त पत्रकार संतोष ढाकणे सर आदी मार्गदर्शकांसह जिओ जिंदगीचे या उपक्रमाचे समन्वयक धनंजय गुंदेकर सातेराम वाणी(निर्मळ वाडी), सीए श्रीहरी पवार (दामोदर वाडी), पपेश पवार (सतवाडी), रमेश हुलगुडे (हिवरा पहाडी), आनंद हुंबे (सरपंच, कारळवाडी) आदींनी या शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.. उर्वरित गावांमध्ये लवकरच हा भाकरीचा दवाखाना पोहोचणार आहे…

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button