गेवराईबीड जिल्हा

छत्रपती संभाजी महाराजांना गेवराईत विनम्र अभिवादन

संभाजीराजे युवा मित्रमंडळाच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन

गेवराई ) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमाचे पालन करत छत्रपती संभाजी महाराजांना
गेवराईत विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी धर्मवीर संभाजीराजे युवा मित्र मंडळाच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवार दिनांक १४ मे रोजी धर्मवीर संभाजीराजे युवा मित्र मंडळ, गेवराई यांच्या वतीने तहसील रोड, संभाजी चौक येथे उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महादेव चिंचोळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप काळे, पत्रकार सखाराम शिंदे, प्रदीप जोशी, अमोल वैद्य, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष दत्ता दाभाडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. सध्या कोरोना महामारीच्या कठीण प्रसंगात रुग्णांना रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे, राज्य सरकारने रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचे आव्हान केलेले आहे. आज छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून धर्मवीर संभाजी राजे युवा मित्र मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जवळपास १०१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

यावेळी वैभव दाभाडे, शंकर खैरे, प्रल्हाद दाभाडे, अक्षय नागरे , राहुल गोरे, सुरज ढोणे, रवी लव्हाळे, सचिन दाभाडे, भैय्या आतकरे, गणेश खैरे, विजय जाधव, विलास ठाकुर, राजू जवंजाळ, महादेव खङके, गणेश खङके, गणेश कादे, भूषण सोलाट, अभिजीत काळे, शुभम काळे, सचिन खैरे, यश जाधव, अमोल दाभाडे, भरत दाभाडे आदींसह छत्रपती संभाजी महाराज प्रेमींची उपस्थिती होती. सदरील अभिवादन आणि रक्तदान शिबिर हे दोन्ही कार्यक्रम कोरोनाचा नियम आणि अटींचे पालन करून संपन्न झाले.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button