बीडबीड जिल्हा

महाराष्ट्राने तुकोबांचा सच्चा वारकरी गमावला

कीर्तनातून समाजजागृतीचे कार्य करणारे बाबासाहेब महाराज इंगळे काळाच्या पडद्याआड

आपल्या विनोदी शैलीने कीर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे प्रबोधन करणारे थोर कीर्तनकार बाबासाहेब इंगळे महाराज यांचे दुःखद निधन झाल्याचे वृत्त आहे. बाबासाहेब इंगळे महाराज हे बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत. एक निष्ठावंत वारकरी म्हणून ते सर्वपरिचित होते. एखादा सिद्धांत पटवून देण्यासाठी निखळ विनोदी दृष्टांत सांगण्याची त्यांची शैली अफलातून होती. त्यांचे गायन आणि वक्तृत्वशैली समाजमनाचा ठाव घेणारी होती. नुकतंच काही दिवसांपूर्वी नाथांचा सच्चा वारकरी भारूडसम्राट निरंजन भाकरे यांच्या अकाली निधनानंतर बाबासाहेब महाराज इंगळे यांचे जाणे वारकरी सांप्रदायाच्या दुःखात भर टाकणारे आहे. बाबासाहेब महाराज इंगळे यांच्या निधनाने वारकरी सांप्रदायाचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे. मी स्वतः बाबासाहेब महाराज इंगळे यांच्या कीर्तनाचा श्रोता आहे. त्यांनी आपल्या कीर्तनाला विनोदाची जोड देऊन अंधश्रद्धेवर केलेले प्रहार समाजोत्थानासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. संतांना अपेक्षित विशेषतः तुकोबांना अपेक्षित कार्य इंगळे महाराजांनी केले. शब्दधनाच्या ताकदीवर समाजाचे प्रबोधन करणारे इंगळे महाराज आपल्या खास कीर्तनशैलीसाठी स्मरणात राहतील. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

– ज्ञानदेव काशिद
९९७०७४३६०४

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button