गेवराईबीड जिल्हा

‘जिओ जिंदगी’च्या वैद्यकीय सेवेसाठी ‘यू-राईज फाउंडेशन’ने दिले 50 हजाराचे मोफत मेडीसीन

गेवराई : जिओ जिंदगी तर्फे सध्या जिल्ह्यात विविध ठिकाणी मोफत रुग्णालय चालविण्यात येत असून यामध्ये कोरोना बाधित रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा दिली जाते. तसेच गावोगावी जाऊन नागरिकांची मोफत आरोग्य तपासणीसह रुग्णांना अडचणीच्या वेळी मदतीसाठी हा ग्रुप सदैव तत्पर आहे. दरम्यान या जिओ जिंदगी ग्रुपच्या उपक्रमाची दखल घेऊन आपण ही समाजाचे काही देणे लागतो या उदात्त भावनेतून गेवराई तालुक्यातील कोळगाव येथील यू-राईज फाऊंडेशनने 50 हजाराचे मेडीसीन शुक्रवारी जिओ जिंदगी ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करत त्यांच्या मोफत वैद्यकीय सेवेला हातभार लावून कोरोना सारख्या संकटात माणुसकीचे दर्शन घडवले.

गेवराई तालुक्यातील कोळगाव येथील उच्चपदस्थ माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत मागील काही वर्षापूर्वी यू-राईज फाऊंडेशनची स्थापना केलेली आहे. या फाऊंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी गावातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, शालेय साहित्य, ड्रेस वाटप तसेच दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना रोख स्वरूपात बक्षीस व सन्मानचिन्हासह गौरविण्यात येते. तसेच यू-राईज फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेतला जात आहे. गतवर्षी मार्च महिण्यात लाँकडाऊनमध्ये गोरगरीबांच्या पोट-पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. यावेळी कोळगाव येथील 100 गोर-गरीब गरजू कुटूंबांना जीवनावश्यक किराणा साहित्यांची किट फाऊंडेशनच्या माध्यमातून वाटप करण्यात आले होते. दरम्यान सध्या कोरोनाने हाहाकार घातला आहे, यामध्ये अनेक रुग्णांचा जीव सुध्दा गेला आहे. शासन, प्रशासनाची सर्वतोपरी यंत्रणा कोविड आजारात व्यस्त असून रुग्णालये हाऊसफुल्ल आहेत. यामुळे अनेक रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याने त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. हि परिस्थिती लक्षात घेऊन बीडमध्ये गतवर्षीपासून सतत रुग्णांच्या सेवेत असलेल्या जिओ जिंदगीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात काही ठिकाणी मोफत कोविड रुग्णालये सुरु करुन बाधित रुग्णांवर मोफत उपचार केले जात आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन यू-राईज फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष इंजि. महेश कांबळे, अध्यक्ष विजय करांडे, सचिन पुणेकर, भिष्मा जगदाळे, गणेश कांबळे, सुधीर कुसमाडे आदींसह सदस्यांनी जिओ जिंदगी ग्रुपच्या सामाजिक कार्यात हातभार लावण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिओ जिंदगीच्या मोफत वैद्यकिय सेवेसाठी आवश्यक मेडीसीन देण्यात आले. यावेळी फाऊंडेशनचे सचिन पुणेकर यांनी जियो जिंदगीचे भागवत तावरे, धनंजय गुंदेकर, दिलीप गोरे यांच्याकडे हे मेडीसीन सुपूर्द केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब सानप, दादासाहेब घोडके, बाळासाहेब घाडगे, नाथ उगलमुघले, विष्णुपंत घोंगडे, हरिभाऊ जाधव, राहुल आतकरे आदी उपस्थित होते. यू-राईज फाऊंडेशनला कैलास मोटे, सुजय शेट्टी, मनोज बच्छाव, प्रसाद मोहिरे, अमर देसाई अन् योगेश चव्हाण यांचे देखील आर्थिक सहकार्य लाभले. दरम्यान यू-राईज फाऊंडेशनच्या या सामाजिक दातृत्वाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button