महाराष्ट्र

मराठवाड्याचे तरुण नेतृत्व हरपले; खासदार राजीव सातव यांचे उपचारादरम्यान निधन

पुणे: काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचे उपचारादरम्यान निधन झाले. रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटरवरून दिली माहिती.

सातव यांना २२ एप्रिल रोजी करोनाची लागण झाली होती. तेव्हा पासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे विश्वासू समजले जाणारे काँग्रेसचे नेते आणि खासदार राजीव सातव यांचे पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले, रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. सातव यांना २२ एप्रिल रोजी करोनाची लागण झाली होती. तेव्हा पासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजकन बनली होती. अखेर आज त्यांनी वयाच्या ४६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.सातव यांना २२ एप्रिल रोजी करोनाने गाठल्यानंतर उपचारानंतर ते बरे झाले होते. मात्र त्यांची तब्येत पुन्हा बिघडली. त्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर बनली.राजीव सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. ते गेल्या २३ दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होते. मुंबईतील डॉक्टरांची टीमही सातव यांच्यावर उपचार करण्यासाठी येऊन गेली होती.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button