गेवराईबीड जिल्हा

गेवराईच्या ऑक्सिजन प्लॅन्टचे काम तात्काळ सुरु करा

माजी आमदार अमरसिंह पंडित यांची मागणी

गेवराई  ) तालुक्यातील कोरोना परिस्थिती बाबत माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी रुग्ण सेवा समिती सदस्यांसह जिल्हा शल्यचिकित्सक यांची भेट घेऊन चर्चा केली, या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. गेवराई रुग्णालयातील ऑक्सिजन प्रकल्प तात्काळ सुरू करण्याची मागणी अमरसिंह पंडित यांनी केली. प्रशासकीय सोपस्कार कागदावर होत राहतील अगोदर काम सुरू करण्याचा आग्रह त्यांनी केला. या बैठकीला डॉ. सुर्यकांत गिते, उपनगराध्यक्ष महेश दाभाडे यांच्यासह डॉक्टर, पदाधिकारी उपस्थित होते.

गेवराईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध होत नसल्यामुळे माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत आज सोमवार दि.१७ मे रोजी बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुर्यकांत गिते, उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. महादेव चिंचोळे, डॉ. राजेश शिंदे, डॉ. सराफ, कोरोना रुग्ण सेवा समितीचे महेश दाभाडे, अँड. सुभाष निकम, कडुदास कांबळे, प्रा. राजेंद्र बरकसे, अक्षय पवार, पत्रकार अमोल वैद्य, प्रशांत जोशी, अंकुश आतकरे, प्रशांत गोलेच्छा, बाळासाहेब सानप, संदिप मडके, दादासाहेब घोडके, सोमनाथ मोटे, आरुण पवार आदी उपस्थित होते. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. रुग्ण सेवा समितीच्या सदस्यांनी मांडलेल्या मुद्द्यांबाबत माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी प्रशासनाला धारेवर धरले.

या बैठकीत ऑक्सिजन प्लँट तात्काळ सुरु करणे, औषधी उपलब्ध करून देणे, बायप्याप मशिन उपलब्ध करणे, रिक्त असलेल्या सर्जन व फिजिशियनच्या जागा भरणे, ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करणे, तात्काळ खर्चासाठी पाच लाख रुपयाचा निधी तालुका स्तरावर उपलब्ध करणे आदी विषयावर चर्चा करण्यात आली. माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करून मुबलक प्रमाणात औषधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या, बैठकीत अनेक विषय मार्गी लागले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करत अमरसिंह पंडित यांनी बैठक घेऊन मार्गदर्शन केले. गेवराईचे माजी उपनगराध्यक्ष तथा कोरोना रुग्ण सेवा समितीचे महेश दाभाडे यांनी याकामी पुढाकार घेऊन ही बैठक घडवून आणल्यामुळे सर्व स्तरातून समाधान व्यक्त केले जात आहेत.

०००

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button