बीड जिल्हा

बंद दुकानाचे भाडे द्यायचे कसे‌?

सततच्या लॉकडाऊनमुळे दुकानदार त्रस्त,

कोरोना सारख्या महामारी मध्ये
अनेक जणांच्या कुटुंबामध्ये
या दीड वर्षाच्या काळात
दुःखाचे संकट कोसळले
जवळ असलेला पैसातर गेलाच पण आपल्या कुटुंबातील सदस्य सुद्धा गमावला,काहीजण या आजारापासून कसेबसे सावरले आहेत आणि जे सावरले आहे त्यांना आता आपल्या व्यवसायाची चिंचा वाटू लागली आहे.अनेकांना आपला मूळ व्यवसाय सोडून दुसरा व्यवसाय करण्याची आज वेळ आली आहे.

बीड जिल्ह्यात अनेक जण
भाड्याने दुकाने घेऊन छोटा व्यवसाय करतात . मात्र ,
गेल्या वर्षीच्या लॉकडाऊन नंतर
थोडाफार व्यवसाय सुरळीत चालला होता, परंतु आज दीड महिन्याच्या लॉकडाऊनमुळे त्यांच्यावर भीषण आर्थिक संकट कोसळले आहे . एकतर दुकान , मालकाला विनंती करणे , खिशातून हे पैसे भरणे , नाही तर व्यवसाय बंद करून गावाचा रस्ता धरण्याशिवाय काही जणांकडे पर्याय राहिलेला नाही .घर आणि दुकान दोन्ही किरायाचे , त्यातच लाइट बिल वेगळे , आता दुकानच बंद असेल तर याचे भाडे कुठून व कसे भरायचे , कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा , अशी चिंता अनेकांना सतावतेय . शहरात अनेक कुटुंबे भाड्याच्या घरात राहतात . भाड्यानेच दुकाने घेऊन छोटा व्यवसाय करतात . मात्र , लॉकडाऊनमुळे त्यांच्यावर भीषण आर्थिक संकट कोसळले आहे .
सध्या जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद आहेत .
बीड शहराचा विचार केला तर
मुख्य बाजारपेठ सुभाष रोड
या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे,
या ठिकाणी छोटे व्यवसायिक जास्त प्रमाणात आहेत, या व्यवसायिकावर सततच्या लॉक डाऊन मुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
कित्येक दुकानांना चार हजार रुपयांपासून तर चाळीस , पन्नास हजार रुपयांपर्यंत भाडे आहे .
व काही दुकानांमध्ये मजूर आहेत, त्या दुकानदारांना दुकानच बंद असल्यामुळे भाडे जर नाही देता आले तर मजूरांना काय देणार ही मोठी चिंता आहे.
त्यातच लाइट बिल वेगळे असते . आता हाताला कामच नाही . दुकाने बंद असल्याने छोट्या व्यावसायिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे . आता हा पैसा भरायचा कुठून याची त्यांना चिंता आहे . काही जणांना तर दैनंदिन गरजा भागविणेसुद्धा अवघड झाले आहे .
आता दुकान बंद राहिली तर पुढे काय होईल , याची चिंता आहे .

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button