बीड जिल्हा

शेतकऱ्यांना गावं तेथे बी-बियाणे व खते उपलब्ध करा:-राजेंद्र आमटे

शिवसंग्राम शेतकरी आघाडीचे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन

बीड ) कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. करोना वाढत असला तरी शेतकऱ्यांना शेती केली तर शेतकऱ्याचं कुटूंब तरनार आहे.करोनच्या पार्श्वभूमी कृषी विभागाने प्रत्येक गावामध्ये कृषी सहायक व कृषी मित्र म्हणून कार्य करणाऱ्या यंत्रणेच्या माध्यमातून कृषी विभाग व जिल्हा प्रशासन,महसूल विभाग यांच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये शेतकऱ्यांना आवश्यक बी-बियाणे,खते यांची मागणी लक्षात घेऊन प्रत्येक शेतकऱ्यांना कृषी केंद्राच्या माध्यमातून गाव तेथे बी-बियाणे ,खते उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे

शेतकऱ्यांना गावं तेथे बि- बियाणे ,खते कृषी विभाग व जिल्हाप्रशासनाने उपलब्ध करून दिल्यावर करोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही व शेतकऱ्यांना बी-बियाणे विकी केंद्रावर रंगा लावण्याची गरज पडू नये या करिता शेतकऱ्यांना गावं तेथे बी-बियाणे खाते उपलब्ध करून देण्याकरिता मा. आ.विनायकराव मेटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसंग्राम शेतकरी आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार सय्यद साहेब यांना निवेदन देण्यात आले
शेतकऱ्यांनची बीड,गेवराई,माजलगाव, आंबेजोगाई, परळी या ठिकाणी खते -बि बियाणे खरेदी साठी शेतकऱ्यांनची हेळसांड होऊ नये म्हणून प्रशासनाने दक्षता घ्यावी अन्यथा शिवसंग्राम शेतकरी आघाडी तीव्र आंदोलन करेल असा इशारा शिवसंग्राम शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष राजेंद्र आमटे,युवा नेते विजय सुपेकर, सामाजिक न्याय विभागाचे सुनील धायजे, शिवसंग्राम कायदे सल्लागार शरद तिपले यांच्या वतीने निवेदन देण्यात आले .

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button