केजबीड जिल्हा

बनसारोळा तालुका केज येथील कोरोना केअर सेंटरला अँड. अजित देशमुख यांची भेट

- गावातल्या केंद्रामुळे रुग्ण समाधानी - अँड. अजित देशमुख

बनसारोळा ( प्रतिनिधी ) बनसारोळा तालुका केज येथे कोविड पेशन्ट साठी कोरोना केअर सेंटरची स्थापना करण्यात आली असून गाव आणि परिसरातील रुग्ण या ठिकाणी उपचार घेत आहेत. गावाकडेच केंद्र मिळाले त्यामुळे ते समाधानी आहेत. त्याच बरोबर या गावातील अन्य जिल्ह्यातील काही रुग्ण देखील गावाकडे उपचारासाठी दाखल झाले आहेत. मानसिक समाधानामुळे आजार बरे होण्यात त्यांना मोठा फायदा होत आहे.

बनसारोळा या केंद्रावर नोडल ऑफिसर म्हणून डॉक्टर कावळे आणि त्यांची टीम उत्तम पणे काम करत आहे. ग्रामीण भागात शाळेच्या परिसरामध्ये आणि निसर्गरम्य वातावरणात हे केंद्र असलेल्या रुग्णांना देखील येथे उपचार घेणे योग्य वाटत आहे. शाळा परिसरात चांगल्या दर्जाची सोय उपलब्ध करून देण्यात आरोग्य विभाग व केंद्र चालक यशस्वी ठरले आहेत.

या ठिकाणी मानवलोक संस्थेने बेड उपलब्ध करून दिले असून त्याआधारे रुग्णांना आराम मिळत आहेत. सर्व रुग्णां बरोबर चर्चा करून त्यांना काही समस्या आहेत का ? याची देखील देशमुख यांनी विचारपूस केली. त्याचप्रमाणे त्यांना दिले जाणारे जेवण आणि अन्य सुविधांचा देखील आढावा घेतला. चांगल्या दर्जाचा उपचार आणि सुविधा मिळत असल्याने देशमुख यांनी समाधान व्यक्त केले.

परगावी राहत असलेल्या परंतु गावातील कोरोना केअर सेंटर मध्ये उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णांचे आजार केवळ आपण गावात आहोत, या मानसिक धिरातून मिळालेल्या धीरामुळे लवकर बरा होत असल्याचे याठिकाणी निदर्शनास आले. आरोग्य खात्याची टीम चांगले काम करत असल्याने देशमुख यांनी डॉक्टर कावळे यांच्यासह त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन देखील केले.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button