बीड जिल्हा

जीओच्या पाठीशी जीजस

जिओच्या सदस्यांनी व्यक्त केले राहुल रेखावार यांचे आभार.

राहुल रेखावर बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असताना त्यांनी आम्हाला कायम प्रेरणा दिली , आज ते भले इथे नाहीत मात्र जिल्ह्याच्या साठी आवश्यक म्हणून शक्य ते करतात , एक संस्था काम करण्यासाठी तयार असल्याचे कळले त्यांनी आवर्जून जीओ सोबत काम करा असे सुचवले , आजची हि समेट त्याचाच परिपाक .

प्रभू यशुची एक सुंदर मालिका रविवारी साडे दहा ला असायची , येशू डोंगरावर असायचा आणि अनेक आजारी लोक त्याच्याकडे यायची , त्याची कृपा व्हायची अन लोक बरी व्हायची , अंधळ्याना डोळे यायचे , जखमा भरल्या जायच्या , लोक प्रचंड आकर्षित होऊन त्या देवाच्या मुलाला प्रेम देऊ लागले आणि मग काही लोकांना ते आवडले नाही मग त्याला क्रूस वर चढवतात , हातात खिळे ठोकतात आणि दुसऱ्या दिवशी लखः प्रकाशात तो परत आलेला . भारताच्या सेवेत जीवन देणाऱ्या मदर तेरेसा त्याच रुग्ण सेवेचा वसा आणि वारसा , सेवा हाच धर्म सिद्ध करताना आमच्या सिस्टर मूळ केरळ च्या मात्र बीड च्या जनतेच्या सेवेसाठी तत्पर झालेल्या आहेत , त्यांच्या सोबत सिस्टर ऐनी , मनीषाताई स्वामी, अविनाश राठोड ग्रामीण भागात काम करणार आहेत . रेखावर साहेबामुळे मोठ काम उभा राहत असल्याचे सांगाव लागेल . साहेब भले बीड मध्ये नाहीत मात्र शक्य तेवढे ते करत आहेत . जीओ जिंदगी व सेंट ऐन्स सोशल सेंटर बीड कडून ग्रामीण भागात भरीव काम उभा करत आहोत .

जीओजिंदगी

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button