गेवराईबीड जिल्हा

गेवराई उपजिल्हा रुग्णालयासह कोविड सेंटरला अखंडित वीज पुरवठा करा

कोरोना रुग्णसेवा समितीने केली मागणी

गेवराई, कोविड रुग्णांवरील उपचार व ऑक्सिजन प्लांटच्या कामासाठी वारंवार खंडीत वीज पुरवठ्यामुळे मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत, तालुक्यातील कोविड सेंटर मधील रुग्णांना खंडीत वीज पुरवठ्याचा फटका बसत आहे, त्यामुळे एक्सप्रेस फिडर द्वारे उपजिल्हा रुग्णालयसह कोविड सेंटरला वीज पुरवठा करण्याची मागणी कोरोना रुग्ण सेवा समितीने केली, याबाबत त्यांनी उपविभागीय अभियंता यांना लेखी निवेदन दिले.

कोरोना रुग्णांवर गेवराई उपजिल्हा रुग्णालयात उपचार केले जात आहेत. रुग्णांना तात्काळ आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी आणि नविन ऑक्सिजन प्लांट सुरु करण्यासाठी माजी आ.अमरसिंह पंडित यांनी विशेष लक्ष घातले आहे, परंतु वारंवार खंडीत होणाऱ्या विज पुरवठ्यामुळे उपजिल्हा रुग्णालयाला अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे. खंडीत होणारा विज पुरवठा टाळण्यासाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयाला एक्सप्रेस फिडर मंजुर करण्याची मागणी कोरोना रुग्णसेवा समितीने महावितरणकडे केली आहे. याबाबत त्यांनी उपविभागीय अभियंता यांना लेखी निवेदन दिले आहे.

कोरोना रुग्णसेवा समितीने महवितरणच्या उपविभागीय अभियंता यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेवराई उपजिल्हा रुग्णालयामध्ये कोविड रुग्णांवर उपचार केले जात आहेत. गंभीर परिस्थिती निर्माण होवू नये म्हणून माजी आ.अमरसिंह पंडित यांनी विशेष लक्ष घालून नविन ऑक्सिन प्लांट मंजुर करण्याची मागणी केली असून लवकरच या रुग्णालयात उभारण्यात येणार आहे. सध्या गेवराई उपजिल्हा रुग्णालयास नविन गेवराई या फिडरवरून विद्युत पुरवठा केला जात आहे. या फिडरवर दुरुस्ती किंवा इतर कामांमुळे बऱ्याच वेळेला विद्युत पुरवठा बंद करावा लागत असल्यामुळे उपजिल्हा रुग्णालयामध्ये खंडीत विज पुरवठ्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत.

सध्याच्या कोरोना परिस्थिती तोंड देण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयास सुरळीत विज पुरवठा करण्यासाठी महावितरणने एक्सप्रेस फिडर मंजुर करून विद्युत पुरवठ्याच्या अडचणी दुर कराव्यात अशी मागणी कोरोना रुग्णसेवा समितीचे पदाधिकारी तथा नगराध्यक्ष महेश दाभाडे, अ‍ॅड.सुभाष निकम, कडुदास कांबळे, प्रा.राजेंद्र बरकसे, दादासाहेब घोडके, बाळासाहेब सानप, प्रशांत गोलेच्छा, संदिप मडके, रंजित सराटे, धर्मराज आहेर, धर्मराज राठोड आदींनी केली आहे. निवेदनाची प्रत पालकमंत्री धनंजय मुंडे यांना पाठविण्यात आली आहे. या मागणी बाबत सत्वर कार्यवाही करण्याचे आश्वासन संबंधित अधिकारी यांनी दिले आहे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button