बीडबीड जिल्हा

मॉब लिंचींग मध्ये आसिफ़ ची हत्या करणाऱ्यांना फाशी द्या – एआयएमआयएम

मॉब लिंचींग मध्ये आसिफ़ ची हत्या करणाऱ्यांना फाशी द्या – एआयएमआयएम
बीड (प्रतिनिधी) – हरियाणा राज्यातील जिम ट्रेनर असलेल्या आसिफ़ ची मॉब लिंचींग मध्ये हत्या करणाऱ्यांना फाशी द्यावी. अशी मागणी एआयएमआयएम पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट शेख शफिक भाऊ यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत देशाच्या राष्ट्रपतींना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, नुकतेच काही दिवसांपूर्वी हरियाणा येथील जिम ट्रेनर असलेले आसिफ़ यांची काही दहशतवाद्यांनी मॉब लिंचींग द्वारे अतिशय निर्ममरित्या हत्या केली. त्यांच्या हत्येत जेवढे दहशतवादी सामील होते त्या सर्वांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. आसिफ़ च्या मारेकऱ्यांना कुठल्याही प्रकारची दयामाया किंवा सहानुभूती न दाखविता मृत्युदंड देण्यात यावा. या मागणीसह आसिफ़ च्या हत्येमुळे त्यांच्या कुटुंबीयांचा कर्ताकमविता पुरुष अवेळी हे जग सोडून गेल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचे मोठे डोंगर कोसळले आहे. अशावेळी देशाचे प्रथम नागरिक असलेल्या राष्ट्रपतींनी या प्रकरणात विशेष लक्ष घालून दोषी असणाऱ्यांना मृत्युदंडाची शिक्षा द्यावी. तसेच आसिफ़ च्या कुटुंबीयांकरिता पुढील मागण्या मंजूर कराव्यात –
1) आसिफ़ च्या कुटुंबियांना पन्नास लाख रुपयांची आर्थिक मदत तात्काळ देण्यात यावी.
2) त्यांच्या पत्नीला कोणत्याही शासकीय विभागामध्ये कायमस्वरूपी सरकारी नोकरी देण्यात यावी.
3) त्यांना असलेल्या तिन्ही मुलांचे शिक्षण शासनामार्फत विनामूल्य देण्यात यावे.
4) तसेच मॉब लिंचिंग द्वारे निर्मम हत्या करणाऱ्यांना घटना घडल्यानंतर लवकरात लवकर मृत्यूदंडाची शिक्षा जाहीर करून ताबडतोब फाशी देण्यात यावी. यासह
5) मॉब लिंचींग साठी कायद्यात कठोर तरतूद करण्यात यावी.
6) मॉब लिंचींग करून एखाद्याचा जीव घेणाऱ्यांना दहशतवादी, उग्रवादी, आतंकवादी, नक्षलवादी घोषित करण्यात यावे.
अश्या मागण्या एआयएमआयएम पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष ॲड. शेख शफिक भाऊ यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत देशाच्या राष्ट्रपतींना  पाठविलेल्या निवेदनाद्वारे केल्या असून निवेदनावर ॲडव्होकेट शेख शफीक भाऊ यांच्यासह एजाज खन्ना भैया, नगरसेवक हाफेज अश्फाक, नगरसेवक अजहर मोमीन, मुफ़्ती वाजेद, सोफीयान मनियार, सय्यद सैफ़ अली लालू आदींची नावे व सह्या आहेत.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button