बीड जिल्हा

सानेगुरुजी कर्मचारी कल्याण मंडळातर्फे दिवगंत कर्मचा-यांच्या वारसांना आर्थिक मदत

अमरसिंह पंडित यांनी सांत्वन करुन दिला आधार

गेवराई) कोरोनाच्या महामारीत दुःखद निधन झालेल्या
जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळातील दिवगंत कर्मचा-यांच्या वारसांना संस्थेच्या सानेगुरुजी कर्मचारी कल्याण मंडळातर्फे
आर्थिक मदतीचे वाटप जयभवानी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत करण्यात आले, यावेळी अमरसिंह पंडित यांनी कर्मचाऱ्यांच्या परिवाराचे सांत्वन करुन त्यांना धिर आणि आधार दिला.

जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित माध्यमिक विद्यालय रामपुरी येथील शिक्षक नामदेव एकनाथ मराठे, माध्यमिक विद्यालय तलवाडा येथील शिक्षक गजानन चंद्रभान नाटकर व माध्यमिक विद्यालय धोंडराई येथील सेवक शेख राजू अजीज यांचे नुकतेच
कोरोनामुळे दुःखद निधन झाले होते. घरातील कमावता व्यक्ती अचानक गेल्यामुळे सदरील कुटुंबाचे मोठे नुकसान झाले. अकाली मृत्यू मुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या दुःखद प्रसंगी जयभवानी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमरसिंह पंडित सर्व कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिले. आज गुरुवार दिनांक २० मे रोजी संस्थेच्या साने गुरुजी कल्याण मंडळामार्फत त्यांच्या हस्ते प्रत्येकी १ लाख रुपयांचा धनादेश गजानन नाटकर यांच्या पत्नी श्रीमती मनिषा नाटकर, शेख राजू यांच्या पत्नी श्रीमती शामिना राजू आणि नामदेव मराठे यांचे प्रतिनिधी राजेश पेजगुडे यांना सुपूर्द करण्यात आले.

यावेळी संस्थेचे कार्यालयीन अधिक्षक काशिनाथ गोगुले, मुख्याध्यापक राजेंद्र जगदाळे, भक्तराज पौळ, अशोक तौर, श्रीराम शेळके यांच्यासह शिक्षक व शिकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमाचे पालन करुन हा छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button