बीड जिल्हा

बीड शहरातील आय.टी.आय. कोविड सेंटर येथे नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या हस्ते कोरोना प्रतिबंधात्मक साहित्याचे वाटप

बीड शहरातील आय.टी.आय. कोविड सेंटर येथे कामगार, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या हस्ते कोरोना प्रतिबंधात्मक साहित्याचे वाटप सुरू करण्यात आले.
करोना महासाथीच्या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी बीड नगर पालिकेच्या वतीने विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या प्रक्रियेत काम करणारे कर्मचारी सुरक्षित राहतील याची काळजी घेतली जात आहे. करोना महामारीच्या काळात बीड नगर पालिकेने आपले मोठे योगदान नोंदवले आहे. शहरातील कोविड सेंटरमध्ये सर्व सुविधा पुरवण्याचे काम नगर पालिका करते,जवळपास 14 महिन्यापासून हे कार्य अविरतपणे चालू आहे. आजच्या परिस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. प्रत्येक ठिकाणी न प चे कर्मचारी काम करतात,त्यांनाही सुरक्षेच्या दृष्टीने काळजी म्हणून नगर पालिकेच्या वतीने कोरोना प्रतिबंधात्मक साहित्याची आवश्यकता होती नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी आजची स्थिती लक्षात घेऊन कामगार कर्मचारी आणि आर्थिक दृष्टया मागासलेल्या नागरिकांसाठी ज्यांच्या घरी प्रत्येकी 5 व्यक्ती गृहीत धरून 4000 हजार कोरोना फॅमिली किट ज्यात मास्क, ग्लोज,सॅनिटायझर हे साहित्य असेल असे 20 हजार नागरिकांना याचा लाभ होणार आहे तसेच
600 थर्मलगण,600 ऑक्सिमिटर,2500 पी पी इ किट,2000 नॉन डीसपोझेबल किट,4000 फॅमिली कोरोना किट ज्यात मास्क, ग्लोज,सॅनिटायझर हे साहित्य नगराध्यक्ष डॉ भारत भूषण क्षीरसागर यांच्या हस्ते वाटप सुरू करण्यात आले आहे.
याप्रसंगी समवेत मुख्याधिकारी डॉ.उत्कर्ष गुट्टे, नगरसेवक तथा युवा नेते डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर, मुखीद लाला यांच्यासह कोविड सेंटरचे कर्मचारी, न.प.कर्मचारी उपस्थित होते.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button