पाटोदाबीड जिल्हा

डोंगरकिनी येथील सत्त्यांनव पैकी चौऱ्यांनव पेशंट केअर सेंटर मध्येच झाले कोरोनामुक्त

रात्रीच्या पाहणीत डॉ. शिंदेही स्पॉटवर - अँड. अजित देशमुख

डोंगरकिनी ) डोंगरकिनी येथे कोरोना केअर सेंटरची स्थापना करून काही दिवस लोटले आहेत. भाटेवाडी, नाळवंडी सह डोंगर किनी परिसरातील रुग्ण या ठिकाणी उपचार घेण्यासाठी आले. या ठिकाणी आलेल्या सत्त्यांनव रुग्णांपैकी तब्बल चौऱ्यांनव रुग्ण या ठिकाणीचं उपचार घेऊन घरी गेले. तीन रुग्ण वरिष्ठ दवाखान्याकडे पाठवण्यात आले. त्यातील दोन रुग्णही बरे होऊन घरी आले. आणि केवळ एक रुग्ण आज रोजी बाहेरच्या दवाखान्यात उपचार घेत आहे. त्यातच केवळ पंधरा रुग्ण आज केअर सेंटर मध्ये डोंगरकिनीत उपचार घेत आहे.

आमदार निलेश लंके यांच्या भाळवणी येथील अकराशे बेडच्या कोरोणा केअर सेंटरला भेट देऊन रात्री साडे नऊ वाजता परत येत असताना जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. देशमुख यांनी डोंगरकिनीच्या या केअर सेंटरला भेट दिली. यावेळी डॉक्टर मयूर शिंदे रात्रीच्या वेळीही येथे उपस्थित होते. डॉ. शिंदे आणि त्यांच्या टीमने चांगला मानसिक आधार देऊन उपचार केल्याने ही बाब सहज शक्य झाली.

आरोग्य विभागाची टीम जिल्ह्यात सर्वत्र या प्रकारे काम करत आहे. रुग्ण आणि नातेवाईकांनी त्यांना योग्य ती काळजी घेऊन मदत करणे आवश्यक आहे. कमी संख्येच्या बळावर आरोग्य खात्याचे कर्मचारी प्रचंड मोठ्या संख्येने निघत असलेल्या रुग्णांना तपासून उपचार करत आहेत. त्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांचे देखील जनतेने कौतुक करायला हवे.

कोरोना केअर सेंटर नसते तर या रुग्णांना लाखो रुपये खर्च करावा लागला असता. मात्र येथे मोफत उपचार मिळत आहेत. त्याचबरोबर मोफत जेवण देखील मिळत आहे. त्यामुळे रुग्ण आणि नातेवाईकांनी नियमांचे पालन करून लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रयत्नशील असायला हवे.

रुग्णसेवेची कोणतीही संधी या केंद्रावरील डॉक्टर सह सर्व स्टाफ सोडत नाही. त्यामुळे अचानक रात्री दिलेल्या भेटीनंतर देखील त्या ठिकाणी सर्व रुग्ण समाधानी होते. प्रत्येक रुग्णाबरोबर देशमुख यांनी चर्चा केली. मिळणारे उपचार आणि जेवण याबाबतही विचारपूस केली. त्यामुळे रुग्णांना देखील मानसिक आधार मिळाला. अँड. अजित देशमुख यांनी यावेळी समाधान व्यक्त केले

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button